Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar on SRPF Training Centre : जामखेडच्या 'SRPF' प्रशिक्षण केंद्रावरून राजकारण तापलं; रोहित पवार आक्रमक, पोलिसांनी रोखलं!

Rohit Pawar Aggressive for SRPF Training Center Inauguration : आमदार रोहित पवारांनी या केंद्राच्या लोकार्पणाचं आयोजन केलं होतं आणि यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना बोलावलं गेलं होतं.

Pradeep Pendhare

Jamkhed SRPF Training Center Inauguration and Politics :जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार रोहित पवार केलं होतं. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलिस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली. यामुळे संतापलेल्या आमदार रोहित पवार यांनी आपल्या समर्थकांसह केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यावेळी चांगले संतापले होते. त्यांनी थेट प्रशिक्षण केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या आमदार पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांची झटापटी झाली. यातच आमदार रोहित पवार यांनी औपचारिक उद्घाटन केले.

मविआ(MVA) सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र मंजूर झालं मात्र महायुती सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र इतरत्र नेण्याच्या हालचाली झाल्या. यावरून आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचात श्रेयवाद रंगल्याचं दिसतंय.

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे नव्याने सुरू होणारे एसआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र मविआ सरकारच्या काळात करण्याचा निर्णय झाला होता. बांधकाम करण्यासाठीची 34 कोटी 37 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 22 जून 22 ला या प्रशिक्षण केंद्राला कार्यारंभ आदेशही देण्यात होता.

आमदार सावकार यांचा पत्र पुन्हा चर्चेत -

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जळगावच्या वरणगावला हलविण्याच्या हालचाली झाल्या. आमदार संजय सावकारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून हे प्रशिक्षण वरणगाव येथे मंजूर करण्यात आले होते. ते पुन्हा वरणगावलाच व्हावं, अशी विनंती केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT