Rupali Chakankar,Rohit Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar on Rupali Chakankar : रोहित पवार रुपाली चाकणकरांचं पदच गिळणार, आगामी अधिवेशनात करणार मोठी मागणी

Rohit Pawar criticizes Rupali Chakankar's working style, Maharashtra State Women Commission : राज्‍यात महिला अत्‍याचाराच्‍या घटनांमध्ये वाढ होत असून, महिलांना संरक्षण देण्यात महिला आयोग अपयशी ठरला आहे असं रोहित पवार म्हणाले.

Ganesh Sonawane

Maharashtra Political News : महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे, त्या पद्दतीने काम करत नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. महिला आयोग कुठल्याही राजकीय पक्षाची शाखा नाही. आयोगात अराजकीय व्‍यक्‍ती नेमल्‍यास त्‍यांच्‍यावर दबाव येणार नाही. आगामी अधिवेशनात याबाबत मागणी करणार असल्‍याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. राज्‍यात महिला अत्‍याचाराच्‍या घटनांमध्ये वाढ होत असून, महिलांना संरक्षण देण्यात महिला आयोग अपयशी ठरला आहे असं रोहित पवार म्हणाले.

महिला आयोग ही घटनात्मक व स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे महिला आयोगावर राजकीय व्यक्ती नसावी. महिला आयोगाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलं. सरकारने महिला आयोगाचा राजीनामा मागावा. आयोगात अध्यक्ष व सदस्य सक्षम असावेत. त्यांच्या नियुक्तीसाठी पात्रतेचे निकष ठरविण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

महिला अत्याचाराची प्रकरणे राज्यात वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे काहीतरी थातूर मातूर उत्तरे न देता महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काय करता येईल यावर विचार व्हायला हवा. त्यादृष्टीने प्रशासनाने यात वेगळ्या प्रकारचे नियोजन केले पाहीजे. ज्यात महिलांना स्वत:हून पुढाकार घ्यावासा वाटेल, तिथे त्यांच्या अडचणी दूर होतील.

यावेळी लाडकी बहिण योजनेवर बोलताना ते म्हणाले, महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी ही योजना राबविली. मात्र आता या योजनेमुळे इतर विभागाच्या योजनांवर परिणाम होताना दिसत आहे. महायुती सरकारमध्ये राज्यातील शेतकरी, दिव्यांग, आदिवासींचा निधी लाडकी बहीण योजनेत वळविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत येत्या १० जूनला ज्‍येष्ठ नेते शरद पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात इतर पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना शरद पवार काय भूमिका घेता हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT