Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar News : रोहित पवारांच्या 'त्या' वाक्याने कर्जतमधील 'विजय निश्चय' मेळाव्याचे वातावरण झाले भावनिक!

Pradeep Pendhare

Sharad Pawar group meeting in Karjat : नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी कर्जत येथे शरद पवार गटाचा विजय निश्चय मेळावा झाला. या वेळी शरद पवार गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना पक्षाचा चिन्ह असलेला गमछा घालायला नव्हता, यावरून आमदार रोहित पवार यांनी यावर भावनिक टिप्पणी केली.

शरद पवार(Sharad Pawar) पक्षात निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार शाल आणि श्रीफळ देण्यात आले. आमदार रोहित पवार म्हणाले, "वास्तविक पाहता आपल्या पक्षाचा गमछा पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्याची इच्छा होती. पण दुर्दैवाने आज तो टाकता येणार नाही." रोहित पवार यांनी असे म्हणताच मंडपातील वातावरण काही काळ भावनिक झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, "कालचा निर्णय असंवैधानिक आहे. मागील अनेक दिवसांपासून देशाचे संविधान बाजूला ठेवण्याचा प्रताप भाजपकडून होत आहे. लढण्याची भूमिका घेत लढूयात. २०२४ ला भाजपची सत्ता आल्यास स्वत:ला योग्य वाटेल असे संविधान निर्माण करून लोकशाही राहील का नाही ? असा बदल घडवतील याची भीती वाटते. जे भाजपबरोबर गेले ते लोकनेते राहिले नाहीत. त्यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचे षडयंत्र भाजप करीत आहे. लोकसभेला जागा पाहून त्यांच्या बरोबर राहतील की, नाही याची भीती भाजपसोबत गेलेल्यांना सतावत आहे".

कडक भाषण करणाऱ्यांना ईडीची नोटीस...

महेबूब शेख यांनी म्हटले की, अन्याय झाल्यावर पक्ष सुटत होता. फुटत होता. मात्र आज पक्ष चोरायची सवय रुजली आहे. पक्षावर दरोडा टाकणाऱ्यांना अद्दल घडवायची वेळ आली आहे. गुजरातला प्रकल्पाचा पेटारा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हातात कटोरा अशी परिस्थिती या राज्य सरकारने उभी केली आहे. सत्तेसाठी बाप बदलायची स्पर्धा महाराष्ट्रात लागली आहे. ईडी मागे लागली की पक्ष बदलतो ही आजच्या राजकारण्यांची परिस्थिती आहे. आज ज्यांनी ज्यांनी कडक भाषण केले, त्यांना ईडीची नोटीस आल्यास नवल वाटू देऊ नका, असे म्हणत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

कुटुंबातील व्यक्तींनीच पक्ष पळवल्याचे शल्य

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिवसेना फुटली त्यावेळीचा व्हिडिओ आपल्या भाषणात उपस्थितांना दाखवला. ज्यांनी सांगितले काल त्यांनीच तो प्रकार केला, याचे दुःख वाटले. निकाल अपेक्षित होता. मात्र, येथे कुटुंबातील व्यक्तीनेच पक्ष पळवला आणि साथ सोडली याचे शल्य मनात आहे, असे ते म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT