Banner battle in Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar : आमदार पवारांच्या मतदारसंघात चाललंय काय? 'सुपारी', 'लाकडी बाज' अन् पुढील अपडेट 16 ऑगस्टला...

Banner battle in Rohit Pawar constituency : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात एका बॅनरमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार अशी चर्चा आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेडमध्ये आगामी काळात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असे संकेत मिळू लागलेत. भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याबरोबर यात्रेतील सहभाग, काँग्रेसने कर्जत-जामखेडवर केलेला दावा आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून विरोधकांचा 'सुपारीबाज' म्हणून करत असलेले हल्ले, यामुळे कर्जतचे राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.

यातच आता कर्जतमध्ये एका बॅनरने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. या बॅनरवर 'कर्जत-जामखेड समाचार' म्हणून 'सुपारी' आणि 'लाकडी बाज', असे चित्र टाकत 'सुपारीबाज' लिहिले आहे. पुढील अपडेट 16 ऑगस्टला, असे म्हटले आहे. हा बॅनरचे बॅकग्राउंड काळे गडद असल्याने तो लक्षवेधून घेतो.

राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. स्थानिक राजकारणात रोज नवनवीन राजकीत अध्याय आखले जात आहेत. कधी कोण कोणाच्या संपर्कात जाईल, याची शाश्वती राहिली नाही. यातच एका निनावी बॅनरमुळे कर्जत-जामखेडमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. हा मोठा बॅनर कर्जतच्या मुख्य रस्त्यावर लावला असून, यावरील मजकुराने संभ्रम निर्माण केला आहे.

बॅनरची का आहे चर्चा

या बॅनरमध्ये पहिल्या ओळीत 'कर्जत-जामखेड समाचार', असे लिहून खाली दुसऱ्या ओळीत भल्या मोठ्या अक्षरात लवकरच घेऊन येत आहे असा इशारा देत त्याखाली 'सुपारी' आणि 'लाकडी बाज', अशा चित्रांची बेरीज करत 'पुढील अपडेट 16 ऑगस्टला', असे नमूद केले आहे. हा बॅनरवर सौजन्य नसल्याने गोंधळ उडाला आहे. हा बॅनर नेमका लावला कोणी? याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत. यातून नेमके काय सूचित करायचे आहे? असा चर्चेचा सूर असून आगामी विधानसभेचे राजकारणावर चर्चा होऊ लागल्या आहेत.

स्वाभिमानाला डिवचू नये

राजकीय हेतूनेच हा बॅनर लावल्याचा दावा काँग्रेसचे (Congress) वकील श्रीहर्ष शेवाळे यांनी केला आहे. कर्जत-जामखेडच्या स्वाभिमानाला डिवचू नये. राजकारणात इच्छा व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार आहे. अनेकांनी राजकारणातून समाजकारण केले. प्रत्येकाला मोठे व्हावे, असे वाटत असते. तशी संधीच्या शोधात असतो. पण कोठेतरी नैतिकता पाळली जावी. कोण सुपारीबाज आहे, त्याचे नाव उघड करावे, बॅनरवर टाकले असले, तर त्याचे कौतुक केले असते, असे श्रीहर्ष शेवाळे यांनी म्हटले.

दरम्यान कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी हा बॅनर कोणी लावला याची माहिती घेत असल्याचे सांगितले. परंतु या बॅनरला परवानगी आहे की नाही, यावर त्यांनी नाही, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT