Sandip-Karnik-Prakash-Londhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Londhe Crime: केंद्रीय मंत्र्यांच्या पक्षाचा अध्यक्ष दहा वर्षे खंडणी वसुलायचा, आकडा ऐकूण पोलिसही चक्रावले!

RPI leader Prakash Londhe is an extortionist, crimes have been going on for ten years,More than twenty crimes-माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याने गेल्या दहा वर्षांपासून शेत- जमिनी आणि बंगले बळकावून खंडणी वसुलीत जम बसवला होता.

Sampat Devgire

Prakash launde News: आरपीआय नेते आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे पोलीस कारवाईत अडकले आहेत. त्यांचे गुन्हे आणि वसुलीच्या रकमा पोलिसांनाही धक्कादायक ठरल्या. गेली दहा वर्ष माजी नगरसेवक लोंढे खंडणी वसुलीत सक्रिय होते.

आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि त्यांच्या टोळीतील १३ जणांविरोधात मोकाची कारवाई करण्यात आली आहे. यातील चार जण अद्यापही फरारी आहेत. त्यात 'पीएल' ग्रुपचा टोळी प्रमुख आणि लोंढे यांचा मुलगा भूषण याचाही समावेश आहे.

या संदर्भात पोलीस तपासात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. खून, खंडणी, जमीन बळकावणे हे प्रमुख गुन्हे 'पीएल' ग्रुप करत होता. गेली दहा वर्ष त्यांचे हे कारणामे सुरू होते.

तपासात गेल्या दहा वर्षांपासून अनेक शेतजमिनी आणि बंगले 'पीएल' ग्रुपने बळकावले. त्यानंतर विक्री आणि कब्जा सोडण्यासाठी कोटींच्या खंडणी वसूल केल्या. या दरम्यान त्यांच्या विरोधात वीस गंभीर गुन्हे दाखल झाले.

सातपूर येथील ऑरा बार आणि रेस्टॉरंटच्या मालकावर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला. दहशत निर्माण करण्यासाठी चापर्णी हल्ला झाला. त्यात ग्राहकासह मालक जखमी झाला. ही घटना लोंढे यांच्या गुन्हेगारीला ग्रहण ठरली.

या संदर्भात पोलिसांनी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याला मुलगा दीपक लोंढे यांसह अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला'हे वदवून घेत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांच्या या कारवाईचा लोंढे यांनी धमकावलेल्यांवर सकारात्मक परिणाम झाला.

त्यानंतर लोंढे पिता पुत्राविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची मालिकाच सुरू झाली. गेल्या २२ दिवसात त्यांच्या विरोधात सात गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यामुळेच त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई झाली.

शेतजमिनी, बंगले आणि अन्य मालमत्ता धमकावून ताब्यात घेतल्या जात होत्या. त्यानंतर त्याची विक्री कोणाला व किती किमतीत करायची हे लोंढे टोळी ठरवत असत. यामध्ये कोट्यावधीची खंडणीची मागणी झाल्याचे उघड झाले. त्या रकमा ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्यातूनच 'पीएल' गॅंगचा पूर्ण बंदोबस्त पोलिसांनी केला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT