Nagar RPI Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar RPI : 'मैं हूं जिल्हाध्यक्ष'; 'RPI'च्या आठवले गटात वाद उफळला

Dispute over Ahmednagar District President post in 'RPI' Athawale group : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या अहमदनगरमधील जिल्हाध्यक्षपदाचा वाद मिटताना दिसत नाही.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या नगरमधील जिल्हाध्यक्षपदाचा वाद मिटताना दिसत नाही. परस्पर दावे करत, जिल्हाध्यक्षपदावर दावे सांगितले जात आहेत.

राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांची निवड केली. परंतु जिल्हाध्यक्षपदावर दावा करणारे संजय भैलुमे यांनी पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्षपदावर दावा कायम ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून 'RPI' आठवले गटात जिल्हाध्यक्षपदावरून वाद आहेत. सुनील साळवे आणि संजय भैमुले यांच्यात हे वाद असून, यातून पक्षात गटबाजी उफाळली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) काळात पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी सुनील साळवे यांची पदावरून हकालपट्टी केली होती. तसे जाहीर देखील केले होते. यानंतर भालेराव आणि वाकचौरे यांनी संजय भैलुमे यांची नियुक्ती जाहीर केली होती. सुनील साळवे यांनी पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेतली आणि पदावर नियुक्ती कायम असल्याचा दावा केला.

जिल्हाध्यक्षपदाच्या वाद उफळत असतानाच रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नगर जिल्हा दौरा केला होता. परंतु वाद मिटेल नाहीत. यात गेल्या आठवड्यात संपर्कप्रमुख भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष वाकचौरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात कार्यकारिणी बरखास्त करत, प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील साळवे यांची निवड जाहीर केली. या पार्श्वभूमीवर संजय भैलुमे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास साठे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष तथा मंत्री आठवले यांची भेट घेतली.

संजय भैमुले यांनी जिल्हा कार्यकारिणीची अहवाल सादर केला. यात नगर जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती आणि राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. "कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच आठवले यांनी भैलुमे यांच्या नेतृत्वाखालील सर्व कार्यकारिणी कायम असून, सुनील साळवे यांची विधानसभा निवडणुकीच्या जिल्हा प्रभारी म्हणून निवड केल्याचे स्पष्ट केले", असे भैलुमे यांनी सांगितले.

तसंच शिष्टमंडळाीतल पदाधिकाऱ्यांनी नगरसाठी दक्षिण आणि उत्तर दोन स्वतंत्र संपर्कप्रमुख नियुक्त करण्याचीही मागणी केली. मंत्री आठवले यांनी त्याला अनुकूलता दर्शवल्याचा दावा संजय भैलुमे यांनी केला. या सर्व घडामोडीवर 'RPI' आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष कोण असा संभ्रम आठवले गटातील कार्यकर्त्यात निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT