Dr. Sanjay Jadhav
Dr. Sanjay Jadhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शरद पवारांच्या घरावरील हल्ला संघानेच घडवला?

Sampat Devgire

नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर काल काही नाराज संपकरी एस. टी. (MSRTC) कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. हा हल्ला एस. टी. कर्मचाऱ्यांचा समजू नये, कारण त्याला सर्व कर्मचाऱ्यांचे अजिबात समर्थन नाही. अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांची भूमिका पाहता यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हे घडवून आणले असावे, असे मत भारीप बहुजन महासंघाचे नेते डॅा. संजय जाधव यांनी सांगितले.

या संदर्भात त्यांनी एक ऑडीओ क्लीप प्रसारीत केली आहे. ते म्हणाले, अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक होणार हे कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जे आंदोलन केले तेव्हाच स्पष्ट झाले होते. यामागे त्यांच्याकडून आपल्या वक्तव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक आणि दुसऱ्या बाजुने भाजपची बाजु घेणे हे दिसत होते. राज्यातील महाविकास आघाडीला त्रास होईल अशी आंदोलने करणे ही अॅड सदावर्ते यांची कार्यशैली झाली होती.

काहीही कारण नसताना, शरद पवार हे सरकारमध्ये नसताना देखील त्यांच्या विरोधात आंदोलन करणे. शरद पवार यांच्यावर टिका करून लोकांना भडकावण्याचे काम त्यांनी केले. खासदार पवार यांच्या घरावर झालेले आंदोलन पुर्णपणे सदावर्ते यांच्या डोक्यातून आलेले असावे असे दिसते. मात्र हा राष्ट्रीय स्वयंसेवकाचा हल्ला समजण्यास पुरेशी परिस्थिती यामागे असल्याने हा `आरएसएस`चाच हल्ला मानला पाहिजे.

प्रवाशांचाही विचार व्हावा

डॅा जाधव म्हणाले, डॅा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही प्रणाली दिली आहे. त्यात संप करण्याचा अधिकार आहे. मात्र संप करताना त्याची काही पद्धत असते. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असतील, मात्र आजवर सर्वच मागण्या मान्य झालेले आंदोलन आपण पाहिले आहे का?. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यावर त्यांनी संप मागे घेऊन उर्वरीत मागण्यासाठी नव्याने काय करता येईल याचा विचार करायला हवा होता. तेच रास्त आहे. कारण एसटीच्या संपाने प्रवाशी व विशेषतः ग्रामीण भागातील गरीब नागरिकाचे खुप हाल झाले. असंख्या विद्यार्थ्यांने नुकसान झाले. ते देखील आपल्या सगळ्यांचे बांधवच आहेत. त्याचा विचार कर्मचाऱ्यांनी कारावा.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT