Sadabhau Khot News, Sadabhau Khot Latest Marathi News
Sadabhau Khot News, Sadabhau Khot Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज्यकर्त्यांनी हर्बल गांजा ओढणे सोडावे!

Sampat Devgire

येवला : कांद्याचे पडलेले दर व शेतकऱ्यांचे (Farmers) होणारे नुकसान याबाबत सरकार (State Government) गांभीर्याने घेत नाही. प्रशासन कांदा प्रश्न गांभीर्याने घेत नाही. राज्यकर्त्यांनी हर्बल गांजा ओढायचे सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी टीका शेतकरीनेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथे केली. (State government ignoring farmers issues)

चिचोंडी येथील शेतकरी शरद कचेश्वर जोशी यांनी पंधरा दिवसांपूर्वी कांदा येवला येथे बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता, कांद्याची प्रत खराब असल्याचे कारण देत या कांद्याला पन्नास रुपयांपासून बोलीला सुरवात झाली. ती ७२ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे पुकारली गेली. या शेतकऱ्याला हा कांदा विकून आपल्या खिशातून ५५० रुपये टाकून वाहतुकीचा खर्च भागवावा लागला होता. हे माहीत झाल्यावर सदाभाऊ खोत आज कांदा परिषदेला जाण्यापूर्वी आज येथील शरद जोशी यांची घरी जाऊन भेट घेत व्यथा जाणून घेतली. (Sadabhau Khot Latest Marathi News)

केंद्राच्या अडवणुकीमुळे फटका

शरद जोशी यांच्यावर पाच लाखांचे सोसायटीचे कर्ज असून, कुटुंब चालून शेती कशी करायची, आसा टाहो या शेतकऱ्यांने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर फोडला. भंगार चाळीस, रद्दी तीस रुपये प्रतिकिलो विकली जाते, यापेक्षाही कमी दर कांद्याला मिळतोय? राज्य शासनापेक्षा केंद्राने कांद्याची केलेली अडवणूक यामुळे हे दर पडलेले आहेत. यावर केंद्राने लवकर निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे मनोज मढवई या शेतकऱ्याने या वेळी म्हटले.

पत्रकारांशी बोलताना राज्यकर्त्यांनी अडीच वर्षांनंतर तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी आम्ही कांदा परिषद घेत असून, आता शेतकऱ्याला आक्रमक रूप धारण करावे लागेल. कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई आता सुरू करावी लागणार असल्याची माहिती खोत यांनी दिली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT