Satyajit Tambe AB form News  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress News : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना त्यांच्या पक्षाच्या सचिवांनीच खोटे पाडले

Satyajit Tambe AB form News : लोंढे यांचा दावा सचिन गुंजाळ यांनी खोडून काढले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Satyajit Tambe AB form News : नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajit tambe) विजयी झाले आहेत. सुरवातीपासून ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी अद्यापही सुरु आहे.

काल सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी पत्रकार परिषदे घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे, नाना पटोले आणि काँग्रेस नेतृत्वावर तांबेंनी गंभीर आरोप केले आहेत.

"संघटनेत मला संधी मिळावी, यासाठी मी वारंवार मागणी केली. मात्र मला संधी नाकारली. वडिलांच्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं. अखेर आम्ही तो निर्णय घेतल्यानंतरही प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म (AB Form) पाठवण्यात आले. त्यामुळेच ऐनवेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला," असे सत्यजित तांबे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

सत्यजीत तांबे यांनी केलेले आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी खोडून काढले आहेत. "सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे आहेत," असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.

"नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते आणि पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता," असे लोंढे यांनी सांगितले.

तांबे यांनी पत्रकार परिषदेनंतर त्यांनी केलेल्या आरोपाचा अतुल लोंढे यांनी समाचार घेतला. "नाशिक पदवीधर मतदारसंघातून कोणी निवडणूक लढायची याचा निर्णय तांबे कुटुंबाने घ्यावा अशीच भूमिका पक्षाने घेतली होती, कौटुंबिक पातळीवरचा निर्णय त्यांनी का घेतला नाही? वेळेवर जाऊन फॉर्म का भरला नाही?, शेवटपर्यत ते कोणाची वाट पहात थांबले होते? सुधीर तांबे यांनी फॉर्म का भरला नाही? कोरे एबी फॉर्म असताना सत्यजित तांबे यांनी आपल्या अर्जासोबत एबी फॉर्म का जोडला नाही? अर्ज भरताना कार्यकर्ते का बरोबर घेतले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती," असे लोंढे यांनी म्हटलं आहे.

लोंढे यांचा दावा सचिन गुंजाळ यांनी खोडून काढले आहेत. गुंजाळ यांनी लोंढेंना पत्र लिहिले आहे. "पत्रकार परिषद घेण्याअगोदर आपण माझ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता, तरीही मी वास्तविकता सांगितली असती. आपण चुकीची माहिती देऊ नये ही अपेक्षा आहे,"असे गुंजाळ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

गुंजाळ यांनी लोंढे यांना लिहिलेलं पत्रात म्हटलं आहे की..

विधानपरिषद निवडणुकीच्या कार्यकाळात माझ्याकडे भारत जोडो यात्रेची जबाबदारी होती त्यामुळे घडलेल्या घटनेच्या दिवशी मी लुधियाना (पंजाब) येथे भारत जोडो यात्रेत राहुलजींच्या कॉर्नर सभेच्या तयारीत व्यस्त होतो. म्हणजे 11 व 12 जानेवारीला मी पंजाब मध्ये होतो महाराष्ट्रात नाशिक मध्ये नव्हतो.

11 जानेवारीला चुकीचा एबी फॉर्म मिळाला म्हणून सत्यजित तांबे यांनी मला फोन केला. त्यानंतर मी संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांना फोन करून तुम्ही चुकीचा फॉर्म पाठवला आहे का? असे विचारले त्यावेळी, त्यांनी मी दुसरा फॉर्म पाठवतो याबाबत आपण कोणाला काही सांगू नका, असे मला सांगितले.

त्यावर मी त्यांना सांगितले की, 'माझा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही कोणता फॉर्म पाठवणार आहात? त्याचा फोटो काढून मला पाठवा', असे सांगितले त्यावर त्यांनी मला कोऱ्या AB फॉर्मचा फोटो पाठवला. मी त्यावर त्यांना OK असा रिप्लाय दिला. हा संपूर्ण घटनाक्रम 11 जानेवारीचा आहे तोपर्यंत AB फॉर्म तांबे यांना मिळाला नव्हता. जो स्क्रीन शॉट आपण माध्यमांना दिला आहे तो 11 जानेवारीचा आहे आणि त्याक्षणाला देवानंद पवार नागपूर मध्ये होते आणि मी पंजाब मध्ये. त्यानंतर माझ्या माणसाला बोलावून त्याच्याकडे सीलबंद पाकीट देण्यात आले. म्हणजे तो स्क्रीनशॉट संगमनेर मध्ये AB फॉर्म ताब्यात मिळाल्याचा नसून, प्रदेशकडून पुन्हा चूक होऊ नये म्हणून मी कोणता AB फॉर्म आपण पाठवणार आहात याच्या खात्रीसाठी होता. तेव्हा AB फॉर्म नागपूरमध्ये देवानंदजी पवार यांचेकडेच होते.

प्रत्यक्षात 12 जानेवारीला सत्यजीत तांबे यांना सीलबंद पाकिटात AB फॉर्म मिळाले. पुन्हा 12 तारखेला दुपारी 1.30 वाजे दरम्यान मला सत्यजीत तांबे यांचा फोन आला, त्यांनी माझ्यावर संताप व्यक्त केला आणि मला सांगितले, AB Form नाव टाकून आलेला आहे, डॉ सुधीर तांबेचे त्यावर नाव आहे. दुस-या रकान्यात जिथे पर्यायी उमेदवाराचे नाव टाकता येते तिथे NIL लिहिलेले आहे.' त्यामुळे प्रदेश काँग्रेसने कोरे AB फॉर्म दिल्याचा दावा खोटा आहे. आदरणीय अतुल लोंढेंजी आपण माझा नामोल्लेख करून चुकीची माहिती देणे टाळावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT