जळगाव : शरद पवार हे शेतकऱ्यांचे नव्हे तर, साखर सम्राट व कारखानदारांचे नेते आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या ऊसाला एकरक्कमी एफआरपी मिळू देत नाहीत. त्यांच्या तोंडात राम आणि बगलेत सुरा असतो. असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत त्यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.
खोत यावेळी बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांचा खजिना कसा लुटायचा यात शरद पवार हे तरबेज आहेत. शुगर केन कंट्रोल कायदा १९६६ प्रमाणे शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास घातल्यानंतर त्याच्या रिकवरी नुसार शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून एकरक्कमी एफआरपी मिळण्याची तरतूद आहे. मात्र, ती टप्प्यात गरजेचे असल्याचे सांगून ६०; २०; २० असे तीन टप्पे करण्यात आले. आणि हे सर्व केंद्र सरकारने ठरवले असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली.
शरद पवारांची ही चाल केंद्राच्या लक्षात आली नाही. मात्र,आम्ही आता शरद पवार यांचा हा शेतकरी विरोधी आणि कारखानदारांच्या हिताचा डाव उधळून लावणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना एक ऊसाची एक रक्कमी एफआरपी देण्यात यावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहोत. राज्यात शेतकऱ्यांची ३२० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ही एफआरपी चुकती करावी त्यानंतर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा. अन्यथा त्यांच्यावर एफआयआर दाखल करून साखर जप्त करून त्याचा लिलाव करून त्यातून शेतकऱ्यांना रक्कम द्यावी अशी मागणी आम्ही करणार.
यासाठी आम्ही लढा सुरू करून साखर आयुक्त यांच्या समोर निदर्शने करणार आहोत. याशिवाय दिल्ली येथे जावून केंद्राच्या मंत्र्याची भेट घेणार असून राज्य सरकारचा या कुटील डावाची माहिती देणार असून त्याबरोबरच, शेतकऱ्यांना ऊसाची एकरक्कमी रक्कम द्यावी, अशी मागणी सुद्धा करणार असल्याचे खोत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.