Sahebrao Patil Experiment: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर त्याची चर्चा झाली. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. हे ऑपरेशन वेळेत आणि चांगले यशस्वी झाले. पारोळा येथील असेच एक ‘ऑपरेशन सिंदूर’ चर्चेचा विषय ठरले आहे.
भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय आहे. भारतीय नागरिकांत देखील त्याची सदैव चर्चा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राजवड (पारोळा) येथे कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही ऑपरेशन सिंदूर केले. विशेष म्हणजे ते वेळे आधीच यशस्वी झाले आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील आपल्या विविध कृषी विषयक प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहेत. राजकारणात काम करताना त्यांनी शेती क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. याच अनुषंगाने त्यांनी जळगावमध्ये सहसा चर्चेत नसलेल्या सिंदूर या रोपांची लागवड करून यशस्वी शेती केली.
माजी आमदार पाटील यांनी १५ ऑगस्ट २०२३ ला आपल्या शेतात सिंदूरची ३५ रोपे लावली. त्याची त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मशागत करून देखभाल केली. त्याचा परिणाम म्हणजे एरवी तीन वर्षांनी या झाडांना फळे येतात. माजी आमदार पाटील यांच्या शेतात मात्र अवघ्या १५ महिन्यातच सिंदूरला फळे लागली. या रोपांच्या बिया वाळवून त्यातील लाल सिंदूर पावडर स्वरूपात काढला जातो. यालाच सिंदूर अर्थात कुंकू म्हणतात.
सध्या बाजारात उपलब्ध असलेले बहुतांशी रंग आणि सिंदूर हे रसायन मिश्रित असतात. रासायनिक निर्मितीतूनच तयार केलेल्या या रंगांचा आणि कुंकू हे घातक मानले जाते. मात्र पर्याय नसल्याने बाजारात सर्वत्र त्याचेच विक्री होत असते. पार्श्वभूमीवर माजी आमदार पाटील यांनी नैसर्गिक सिंदूर अर्थात कुंकू उत्पादन घेतले आहे. आमदार पाटील यांचा हा प्रयोग त्यामुळेच विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.