Nashik Hindu Sanghatana Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video Nashik Hindu March : सकल हिंदू मोर्चात तणाव ! दोन गट आमने-सामने; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

Nashik Sakal Hindu Samaj March : बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू सकल समजाच्या मोर्चाने नाशिकमध्ये काढलेल्या मार्चाने दुकाने बंद करण्याच्या आवाहनाला विरोध करण्यात आला.

Sampat Devgire

Nashik News : बांगलादेशातील घटनांच्या विरोधात सकल हिंदू समाजातर्फे आज शहरात बंद पुकारण्यात आला आहे या बंदला ठीक ठिकाणी प्रतिसाद मिळाला. मात्र काही अति उत्साही युवकांनी रॅली काढत दिलेल्या घोषणांनी शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले.

दुपारी बारापासून सातत्याने वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने जमाव विरळ होताच पुन्हा नव्याने जमा जमत असल्याचे असल्याचे चित्र आहे त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

शहरात शुक्रवारी सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात दुचाकीवरून रॅली काढत घोषणाबाजी केली.

या अति उत्साही युवकांच्या आक्रमक घोषणामुळे शहरातील भद्रकाली आणि दूध बाजार भागात वेगळीच अफवा पसरली होती. मात्र भद्रकाली ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली

दुसरीकडे उत्तर प्रदेशात काही नेत्यांकडून विशिष्ट धार्मिक समाजाबाबत आक्षेपार्य घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याच्या निषेधार्थ शहरातील अल्पसंख्यांक भाग असलेल्या भद्रकाली आणि जुने नाशिक येथे मुस्लिम समाज बांधवांनी बंद पुकारलेला होता. हे दोन्ही बंद सुरळीत सुरू होते. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त देखील होता.

दुपारी शालिमार येथून सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात येणार होता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काही अफवा पसरल्याने भद्रकाली भागात तणाव निर्माण झाला. यावेळी काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शांतता प्रस्थापित केली.

यावेळी मोठ्या बंदोबस्त साईनाथ होता त्यामुळे अनर्थ टाळला पोलिसांनी यंत्रणेला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT