Malegaon News: अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या सिकंदर सिनेमाला संमिश्र प्रतिसाद आहे. हा सिनेमा अपेक्षित कलेक्शन करू शकलेला नाही. मात्र याला सिनेमा चाहत्यांचे मालेगाव (Malegaon) शहर अपवाद ठरले आहे.
मालेगाव शहरात बुधवारी (ता.2) सिकंदर सिनेमाचा खेळ सुरू असताना गोंधळ झाला. हा खेळ हाउसफुल होता. खेळात जोहराजबीन हे सलमान खान आणि रश्मिका मंदानाचे मल्टिस्टार कास्ट असलेलं गाणे सुरू झाले. यावेळी चाहत्यांनी एकच जल्लोष करत सिनेमागृह डोक्यावर घेतले.
यावेळी काही अतिउत्साही प्रेक्षकांनी आणि अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांनी सिनेमागृहात आतिषबाजी केली. दहा ते पंधरा मिनिटे ही आतिषबाजी सुरू होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या आतिषबाजूने काहींना इजा देखील झाली.
हा सर्व गोंधळ आणि फटाक्यांची आशिष बाजी सलमान खान फॅन मालेगाव या फेसबुक पेजवर व्हायरल करण्यात आली आहे. यापूर्वी "टायगर ३" सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान देखील सिनेमागृहात आतिषबाजी झाली होती. प्रेमाचा आनंद घेताना प्रेक्षकांना धोका निर्माण होईल असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सिनेमागृह चालकांनी पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
हा गोंधळ सुरू असताना अनेक चाहते मोबाईलवर त्याचे चित्रीकरण करण्यात दंग होते. फटाके आणि आतिषबाजी नेमकी कोणी केली हे मात्र शेवटपर्यंत समजू शकले नाही. सलमान खानच्या चाहत्यांनी हे सगळे पूर्व नियोजनानुसार केल्याचे स्पष्ट झाले आहे. संदर्भात पोलिसात (Police) कोणतीही नोंद अद्याप नाही.
अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा महत्त्वाकांक्षी सिनेमा रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमावर छावा चित्रपटाचे कलेक्शन आणि कामगिरीचे दडपण आहे. मात्र मालेगाव मध्ये सलमान खानच्या चाहत्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
मालेगाव हे चित्रपट शौकिनांचे शहर म्हणून मानले जाते. ती काही हौशी आणि कल्पक कार्यकर्त्यांनी स्वतःचे सिनेमे देखील निर्माण केले आहेत. सध्या सुरू असलेले सकाळचे शो गेली अनेक वर्ष मालेगावमध्ये होत आले आहेत. मालेगाव शहरातील चित्रपटगृहांमध्ये सकाळी सहालाच सिनेमाचे खेळ सुरू होतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.