Samta parishad agitation at Dhule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation Issue : ...तर समता परिषद गावागावांत आंदोलन करील!

Sampat Devgire

Dhule News : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. ओबीसी घटकांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. त्यासाठी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले देऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (State government should rethink on Maratha reservation issue)

मराठा (Maratha) समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ‘ओबीसी’ (OBC) संघटनांच्या मागण्यांचा विचार करावा. अन्यथा राज्य सरकार (Maharashtra Government) विरोधात गावागावांत आंदोलन करू असा इशारा समता परिषदेने (Samata Parishad) दिले आहे.

मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला. परिषदेच्या आंदोलकांनी निदर्शने करत शुक्रवारी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. या समाजातील गरीब समुहाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे.

मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे. तसेच मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाज गावागावांत आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, बळीराम पगारे, रविंद्र खैरनार, बी. एन. बिरारी, दिलीप देवरे, उमाकांत खलाणे, रविंद्र माळी, उमेश महाजन, गुलाब माळी, राजकिशोर तायडे, गोकुळ पाटील, धीरज माळी, रवींद्र खैरनार, चेतन खैरनार, डॉ. विशाल जाधव, अमोल अहिरे, उमेश खलाणे, प्रा. रवींद्र पाटीलआदी सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT