Sameer Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sameer Bhujbal : समीर भुजबळांचा राजीनामा खरंच राजकीय स्टंट होता का? दादा सांगतील तेव्हाच काय ते...

Sameer Bhujbal resigns from NCP, Awaiting Ajit Pawar’s official response : समीर भुजबळ यांनी आपण पक्षाचा राजीनामा दिला होता, मात्र पक्षाने तो काही स्विकारलेला नाही त्यामुळे आपण पक्षातच असल्याचे समीर भुजबळ सांगत आहेत. छगन भुजबळ यांचेही तेच मत आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपात नांदगाव विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती. तिथे शिवसेनेचे सुहास कांदे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन कांदे यांच्याविरोधात उमेदवारी केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई शहर अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.

समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने नांदगावात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक व अपक्ष समीर भुजबळ अशी तिहेरी लढत या मतदारसंघात झाली. प्रामुख्याने समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यात सामना रंगला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी समीर भुजबळांचा मोठ्या मतांनी पराभव केला. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी आपण पक्षाचा राजीनामा दिला होता, मात्र पक्षाने तो काही स्विकारलेला नाही. त्यामुळे आपण पक्षातच असल्याचे समीर भुजबळ सांगत आहेत.

राजीनामा दिल्यानंतरही आपण पक्षाच्या मुंबई येथे झालेल्या काही कार्यक्रमांत सहभागी झालो होतो अशी माहितीही समीर भुजबळांनी दिली. आपण राजीनामा दिला मात्र तो पक्षाने स्विकारला नसल्याने आपण आजूनही पक्षातच असल्याचे समीर भुजबळांनी नुकतेच म्हटले होते. समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ छगन भुजबळ यांनीही समीर भुजबळ यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा राजीनामा पक्षाने स्विकारला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ यांचा राजीनामा केवळ राजकीय स्टंट होता का असा सवाल केला जातो आहे?

या सगळ्या घडामोडींवर बोलताना सुहास कांदे यांनी तर अजित पवारांकडून समीर भुजबळांना पक्षातून हुसकवण्यात आले आहे. अजित पवारांनी त्यांचा राजीनामा त्याचवेळी स्विकारला होता. महायुतीत तसं ठरलंच होतं. जो कोणी युतीधर्म मोडेल, युतीच्या विरोधात उमेदवारी करेल त्याला पक्षातून काढून टाकलं जाईल, त्यानुसार समीर भुजबळांनी पक्षाने हकाटपट्टी केली आहे. महायुतीत जे विरोधात होते अशा पक्षातून काढून टाकलेल्यांना परत घेण्यासंदर्भात कोणताही पॉलिसी महायुतीत ठरलेली नाही असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

मात्र, यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाने कोणतेही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. समीर भुजबळांचा राजीनामा स्विकारला की नाही यावर अजित पवारांनी स्वत:काही स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे नेमकं खरं काय? समीर भुजबळ हे आजूनही राष्ट्रवादी(अजित पवार) यांच्या पक्षात आहे किंवा नाही. अजित पवारांनी त्यांचा राजीनामा स्विकारला होता का? की केवळ हा राजकीय स्टंट होता? यावर अजित पवार कधी बोलणार आहेत? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT