Independent MLA Satyajeet Tambe And CM Devendra Fadnavis sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis And Satyajeet Tambe : 'देवाभाऊ म्हणजे शब्दांचा बादशहा!', तांबेंच्या कौतुकानं काँग्रेस-भाजपमध्ये कुजबुज सुरू

Independent MLA Satyajeet Tambe praise for CM Devendra Fadnavis : नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेरमधील रखडलेल्या एका प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकाची पोस्ट केल्यावरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांचे कान टवकारलेत.

Pradeep Pendhare

  1. आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

  2. या कौतुकामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांमध्ये चर्चा रंगली आहे.

  3. तांबे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Nashik Graduate MLA news : काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे संगमनेरच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहे. आमदार तांबे हे अपक्ष असले, तरी त्यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेसमधून सुरू झालेला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा पोत बघता तांबे यांनी आपली राजकीय भूमिका बदलली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली आहे. यातच एका रखडलेल्या प्रकल्पाचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावताच, त्यांचे तांबे यांनी तोंड भरून कौतुक केले आहेत. त्यांनी त्यांच्या एक्स खात्यावर कौतुकाची पोस्ट शेअर केली आहे. आमदार तांबे यांनी ही पोस्ट शेअर करताच काँग्रेससह सत्ताधारी भाजप नेत्यांनी कान टवकारलेत.

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पारेगाव इथल्या प्रस्तावित अवादा कंपनीचा 5 मेगावॅट क्षमतेचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांपासून विविध वादांमुळे रखडलेला होता. या प्रकल्पाबाबत गावकरी आणि कंपनीमध्ये तीव्र मतभेद होते. संगमनेरमधील जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून हे गाव दत्तक घेण्यात आलेले आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले होते. या प्रकल्पामुळे ही झाडे तोडली जाणार असल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला. तरीही कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता.

गावकऱ्यांच्या या संघर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी 18 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सभागृहाच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून दिला. या गंभीर मुद्द्याची मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत, “गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या गरजेनुसारच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल,” अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानं अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितलं. त्यांच्या पुढाकारानं संगमनेर इथं बैठक झाली. ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. आज या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून, याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

देवाभाऊ म्हणजे शब्दांचा बादशहा!

आमदार सत्यजीत तांबे यांनी, गावकऱ्यांच्या आनंदाकडे लक्ष वेधलं. तसंच देवाभाऊ म्हणजे शब्दांचा बादशहा! असे एक्सवर पोस्ट शेअर करत कौतुक केलं. 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने'अंतर्गत उभारला जाणारा हा पाच मेगावॅट प्रकल्प पारेगावसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

काँग्रेसह भाजप गोटात अस्वस्थता

या सर्व प्रकरणात सकारात्मक भूमिका दाखवत, यावर तात्काळ तोडगा काढल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानलेत. हा लढा एकजुटीने आणि सक्षमपणे लढणाऱ्या पारेगाव ग्रामस्थांचे आमदार तांबे यांनी कौतुक देखील केलं. दरम्यान, आमदार तांबे यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक काँग्रेसह भाजप नेत्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी ठरू लागली आहे.

नगरसेवकांबरोबर फोटोसेशन

अधिवेशनाच्या सुरवातीला सत्यजीत तांबे यांनी नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे सर्वच्या सर्व नगरसेवक घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आई माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, पत्नी नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि ते स्वतः उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर नगरसेवकांनी काढलेल्या फोटो देखील आमदार तांबेंनी समाज माध्यमांवर शेअर केलेत. यातच पुन्हा देवाभाऊचे कौतुक म्हटल्यावर आमदार तांबेंनी भाजपच्या दिशेनं वाढवलेलं पाऊल तर नाही ना, अशी चर्चा दोन्ही बाजूनं पुन्हा सुरू झाली आहे.

FAQs :

1. सत्यजीत तांबे यांनी कोणाचे कौतुक केले?
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.

2. या कौतुकाचे कारण काय आहे?
रखडलेल्या प्रकल्पाला गती दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

3. यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत?
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये यावर चर्चा सुरू झाली आहे.

4. तांबे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
ते सध्या अपक्ष आमदार आहेत, पण त्यांचा प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला आहे.

5. या घटनेचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT