Gramsevak viral video Maharashtra : भाजप मंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याच्या व्हिडिओवरून चांगलेच राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ समाज माध्यमांवर समोर आला. त्यानंतर अधिकच गदारोळ झाला.
मंत्री बोर्डीकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. परंतु संगमनेर दौऱ्यावर असताना, मंत्री बोर्डीकर यांनी या व्हिडिओमागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा स्थानिक नेता आणि आमदार पवार यांचा मित्र असल्याचे सूचक इशारा केला. मंत्री बोर्डीकर यांनी व्हिडिओमागील इनसाइड स्टोरी समोर आणल्यानं सत्ताधारी महायुतीमधील धुसफूस देखील समोर आली आहे.
मंत्री मेघना बोर्डीकर यांनी या अर्धवट व्हिडिओ मागे कोण आहे, हे सांगताना महायुतीमधील (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजितदादा यांच्या नेत्याचं नाव घेण्याचं टाळलं. परंतु सूचक असा इशारा देताना, अजितदादांकडे असलेले अन् रोहित पवार यांचे जुने मित्र असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील विजय भांबळे यांच्याकडे या व्हिडिओसंदर्भात सूचक, मंत्री बोर्डीकर यांनी बोट केलं आहे.
मेघना बोर्डीकर म्हणाल्या, "रोहित पवार (Rohit Pawar) अर्धवट माहिती पसरवतात. रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाली आहे. आमच्या मतदारसंघातले रोहित पवारांचे जुने मित्र अजितदादांकडे आलेत. त्यांनीच हा कार्यक्रम केलाय. त्यांनीच रोहित पवारांना अर्धवट माहिती पोचवली".
रोहित पवारांना काही काम नसल्याने अर्धवट माहितीच्या आधारे दुसऱ्यांना दोष देत आहेत, असे सांगताना अजितदादांचे नेते विजय भांबळे यांच्याकडे मंत्री बोर्डीकर यांचा रोख स्पष्ट होता. विजय भांबळे यांनीच रोहित पवारांना व्हिडिओ दिल्याचे मेघना बोर्डीकरांना सूचक सांगितल्याने महायुतीमधील अंतर्गत जिरवाजिरवी समोर आली आहे.
ग्रामसेवकाविषयी केलेल्या विधानावर मंत्री बोर्डीकर यांनी माझ्याजागी कुणीही असते, तर त्याच भावना असत्या. कारण ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या संतापजनक प्रतिक्रिया होत्या. या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे. याबरोबर मी घडलेल्या प्रकाराबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील कल्पना दिली आहे. सर्वच ग्रामसेवक तसे नाहीत. परंतु गावात एखाद्या नेत्याचा किती हस्तक्षेप, असावा हे लोकांनी ठरवले पाहिजे, असेही बोर्डीकर यांनी म्हटले.
दरम्यान, ग्रामसेवक यूनियन मंत्री बोर्डीकर यांच्या विधानावर आक्रमक झाली होती. आज परभणीमधील ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन केलं. मंत्री बोर्डीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करताना, ग्रामसेवकांवर असलेल्या राजकीय दबाव दूर करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.