Eknath Khadse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon District Bank : संजय पवारांनी डाव टाकला, आघाडीला थांगपत्ताच नाही : मतदान झाल्यावरच बिंग फुटले

जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर नेते संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

कैलास शिंदे

Jalgaon News : जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर नेते संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ekhnath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांनी आपल्याला जिल्हा बॅंक अध्यक्षपदाची संधी द्यावी यासाठी पक्षाकडे मागणी केली होती.

अध्यक्षपदासाठी संजय पवार यांनी पक्षाच्या नेत्यासह भाजप (BJP) व शिंदे गटाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. पक्षाने उमेदवारी दिलीच नाही तर वेळ प्रसंगी बंडखोरी करून निवडणूक लढविण्याचा त्यांचा निश्‍चय दिसून येत होता. विशेष उमेदवार निश्चित करतांना महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकिलाही संजय पवार उपस्थित होते. त्यावेळीही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे बंडखोरी होणार हे आघाडीलाही माहित होते.

त्या मुळे त्यांच्या नेत्यांनी उमेदवारीबाबत संमजस्यपणे निर्णय घेतला असता, तर आज राष्ट्रवादी काँग्रेसने पर्यायाने 'महाविकास आघाडी'वर नामुष्कीची वेळ आलींच नसती. कल ओळखून त्यांनीच संजय पवार यांचे नाव घोषित केले असते, तर महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले असते आणि भाजप व शिंदे गटालाही धक्का दिला गेला असता. मात्र, महाविकास आघाडीची बेसावध भूमिका या पराभवाला कारणीभूत ठरली असल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज शिवसेना शिंदे गट व भाजपने यश मिळविले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील मते फुटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात फारसे आलबेल नसल्याचे चित्रही समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी कॉंग्रेसची मते फुटल्याचा दावा केलेला आहे. तर काँग्रेसचे सदस्य व जिल्हा बँक संचालक विनोद पाटील यांनी आमचे एकही मत फुटले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच फुट झाली आहे, असा दावा केला.

त्यांनी आपल्या पक्षात पहावे असा पलटवार विनोद पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पडलेली ही फुट आणि शिवसेना शिंदे गट व भाजपची युती आगामी होणाऱ्या निवडणुकीवर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतील. संजय पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत फायदेशीरही ठरू शकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT