NMRA house demolition controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : 'कुंभमेळा येईल आणि जाईल, त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना उध्वस्त करू नका..'; 'एनएमआरडीए'च्या घरे पाडण्याच्या कारवाईवरून ठाकरेंचा नेता आक्रमक

Sanjay Raut on NMRA Action : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चेंगराचेंगरी होईल अशी भीती प्रशासनाला वाटते. त्यासाठी 20 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्यांवरील घरे पाडण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील या कारवाई विरोधात असंतोष वाढत आहे. गेले दहा दिवस या प्रश्नावर कैलास खांडबहाले यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

Sampat Devgire

Nashik News, 31 Oct : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चेंगराचेंगरी होईल अशी भीती प्रशासनाला वाटते. त्यासाठी 20 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्यांवरील घरे पाडण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील या कारवाई विरोधात असंतोष वाढत आहे.

गेले दहा दिवस या प्रश्नावर कैलास खांडबहाले यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी हे काम थांबविण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

आता या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिंहस्थ कुंभमेळा येईल आणि जाईल. त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना का उध्वस्त केलं जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार राऊत यांनी 'एनएमआरडीए'च्या कारवाईवर अनेक आक्षेप घेतले आहेत. कारवाईमुळे तीन ते चार हजार शेतकरी बाधित होणार आहेत. शासनाची परवानगी घेऊन बांधलेली घरे, बांधकामे कोणत्या नियमाने पाडली जात आहेत.

'एनएमआरडीए'ची ही एकतर्फी कारवाई तातडीने थांबवण्याची आवश्यकता आहे. शासनाला जमीन हवी असल्यास रीतसर पंचनामे करून संपादित करावी. त्याचा नियमानुसार चर्चा करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सिंहस्थ कुंभमेळा त्रंबकेश्वर शहरात कुशावर्त आणि नाशिक शहरात रामकुंड येथे होतो. भाविकांची सर्व गर्दी तेथे असते. त्यामुळे चेंगराचेंगरी झालीच तर शहरात होईल. 20 किलोमीटर लांब त्रंबकेश्वर रस्त्यावर कशी चेंगराचेंगरी होईल? असा गंभीर प्रश्न त्यांनी केला.

प्रशासनाने अवघ्या सात दिवसांची नोटीस देऊन पाडकाम सुरू केले. त्यात येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी स्वतःच्या जागेत बेघर झाले. ही हुकूमशाही आणि एकतर्फी कारवाई थांबवावी. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याची दखल सरकारने न घेतल्यास मोठे आंदोलन उभे राहील असा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT