नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या शिल्पकारांपैकी एक आहेत. (He is craftsman if mahavikas Front) त्यामुळे शिल्पाला ओरखडा जाणार नाही, याची काळजी शिल्पकारांनी अधिक घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया येथे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नोंदवली.
श्री. भुजबळ आणि शिवसेनेचे नांदगावचे खासदार सुहास कांदे यांच्या वादंगाच्या अनुषंगाने श्री. राऊत यांनी नांदगावमध्ये वक्तव्य केले होते.
नांदगावला लाल दिवा देऊ, श्री. भुजबळ यांचा पाहुणचार केला जाईल, असे श्री. राऊत यांनी म्हटले आहे. त्याबद्दल काय सांगाल? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. भुजबळ म्हणाले, की श्री. राऊत यांचे बोलणे मी ऐकलेले नाही. तरीही कुठल्या आवाजात बोलले जाते त्यावर अर्थ निघतो. राहिला विषय पाहुणचाराचा, तर मराठी संस्कृतीत पाहुणचार देणे-घेण्याची सवय आहे.
ते म्हणाले, मला मान्य आहे, की मी शिवसेनेमुळे मोठा झालो; पण संधी आपोआप मिळत नाही. त्यावेळी संजय राऊत नव्हते. कष्ट, धडाडी, धोका पत्करण्याची तयारी आणि काम पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिली. नांदगावला विसरा, अशी टिप्पणी श्री. राऊत यांनी श्री. भुजबळ यांचा मुलगा पंकज यांनी नांदगावमधून विधानसभेतील प्रतिनिधित्वाच्या अनुषंगाने केली होती. त्याबद्दल श्री. भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आपण आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये नांदगावला जायचे की नाही, हे विचारावे लागेल.
नांदगावचा विकास...
नांदगावला विसरणे मला कठीण आहे. येवल्यातील शेतकऱ्यांचा रोष पत्करून त्यांची जमीन घेतली. त्यावर मनमाडच्या पाण्यासाठी पाझर तलाव केला. ४४ कोटींची नळयोजना केली. त्यामुळे मनमाडला पाचपट पाणी मिळते. नांदगावसाठी दहा वर्षे काम केले. प्रशासकीय भवन बांधले. नस्तनपूरच्या शनिमंदिराचा जीर्णोद्धार केला. रस्ते बांधले. नांदगावचा वाहून गेलेला पूल उभा केला. त्यामुळे नांदगावमधील कामातून तयार झालेल्या मित्रत्वाला मला विसरता येणार नाही.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.