Sanjay-Raut-Girish-Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raut Vs Mahajan Politics: संजय राऊत यांचा पलटवार, "गिरीश महाजन तुम्ही प्रमोद महाजन नव्हे, जामनेरचे महाजन आहात"

Sanjay Raut; Shiv Sena leader Sanjay Raut directly challenged Girish Mahajan-संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना तुमची सत्ता गेल्यावर काय होते ते पहा असे आव्हान दिले.

Sampat Devgire

Sanjay Raut News: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले होते. नाशिक पुणे किंवा मुंबई यापैकी एका ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवा असे महाजन म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनीही पलटवार केला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. मुंबई ठाणे आणि नाशिकसह काही महापालिकेचे राजकारण त्यामुळे बदलेल. त्याचा मोठा फटका महायुतीला बसणार आहे. मनसे आणि शिवसेना युती चांगली कामगिरी करून दाखवील असे संजय राऊत म्हणाले होते.

त्यावर भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. राज्यातील जनता भाजपसोबत आहे. महापालिका निवडणुकांचे घोडा मैदान जवळ आहे. मुंबई पुणे किंवा नाशिक यापैकी कुठेही एका ठिकाणी शिवसेनेने निवडून येऊन दाखवावे, असे गिरीश महाजन म्हणाले होते.

जलसंपदा मंत्री महाजन यांच्या टीकेला खासदार राऊत यांनीही त्याच टोकदार शब्दात उत्तर दिले आहे. गिरीश महाजन म्हणजे काही महर्षी व्यास नाहीत. त्यांनी स्वतःला प्रमोद महाजन देखील समजू नये. ते जामनेरचे गिरीश महाजन आहेत हे कायम लक्षात ठेवावे.

केंद्रात आणि राज्यात मत चोरी करून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आहेत. हे सरकार काही खऱ्याखोऱ्या जनतेचे प्रतिनिधित्व करीत नाही. यांची सत्ता गेल्यानंतर त्यांचे काय होईल, याचा विचार त्यांनी करून ठेवावा. विशेषतः सत्ता गेल्यावर गिरीश महाजन यांचे काय होईल याचा विचार त्यांनी केला आहे काय?, असा प्रश्न राऊत यांनी केला.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष हा मतांची चोरी करून सत्तेत आल्याचा दावा केला. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह भाजपचे वस्त्रहरण केले असल्याचा दावा केला. त्यामुळे मिस्टर महाजन तुमची मस्ती ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची आहे. तुम्ही जामनेर चे गिरीश महाजन आहात. आपण कोण आहोत? आणि आपले धंदे काय आहेत? यावर आत्मचिंतन करा, असा सल्ला राऊत यांनी दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धास्ती आता महायुतीला बसली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे वातावरण आणि महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलणार आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी आधी स्वतःकडे पहावे नंतर ठाकरे कुटुंबीयांवर टीका करण्याचे धाडस करावे असेही राऊत यांनी सुनावले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT