Shiv Sena Symbol Case : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर खटला सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत असून यासंदर्भात अंतिम निर्णय काय होतो हे बघण्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.
कपिल सिब्बल यांचा ज्या पद्धतीने युक्तीवाद सुरु आहे तो पाहाता ठाकरे गटाच्या नेत्यांचा आत्मविश्वास उंचावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात ठाकरेंचे फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत यांचाही आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांना भविष्यात भारतीय जनता पार्टील विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आज नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन ठाकरे सेनेचा जनआक्रोश मोर्चा निघत आहे. या मोर्चाची तयारी करण्यासाठी कालच संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले. त्यावेळी शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरु असलेल्या खटल्याविषयी त्यांनी हा दावा केला. आमच्या पक्षालाच धनुष्यबाण चिन्ह मिळणार असून एकनाथ शिंदेंना भाजपत विलीन व्हावे लागेल असं राऊत म्हणाले.
निवडणूक आयोगाने विधिमंडळ बहुमताच्या आधारावर 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला अधिकृत शिवसेना ठरवलं. त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह व शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंकडे गेलं. त्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मागची दोन वर्ष या खटल्याची सुनावणी अनेकदा पुढे ढकलली गेली. पण आता नियमित सुनावणी सुरु असून कपील सिब्बल यांचा युक्तिवाद पाहाता उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसत आहे.
आपला विजय होईल असा ठाकरे गटाच्या नेत्यांना आत्मविश्वास वाटत आहे. आम्ही सर्व समाधानी असून, आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास यापूर्वीही संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.