Amit Shah & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: 'काहीही केले तरी महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातून गेली आहे'

Home Minister Inspects the Constituencies in a Defense Ministry plane: संजय राऊत यांनी अमित शहा संरक्षण खात्याचे विमान घेऊन निवडणुकीचा आढावा घेतात अशी टिका केली आहे.

Sampat Devgire

Sanjay Raut Vs BJP News: नागपूर पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिकचा आढावा घेतील. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथे होत आहे. या बैठकीसाठी पदाधिकारी सजग आहेत.

या बैठकीवरून विरोधकांनी मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत. लद्दाख मध्ये सैन्य घुसले आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये संवेदनशील स्थिती झाली आहे.

मणिपूर राज्य जळते आहे. काश्मीरमध्ये अशांतता आहे. मात्र हे सर्व प्रश्न वाऱ्यावर सोडून गृहमंत्री संरक्षण खात्याच्या विमानाने महाराष्ट्रात निवडणुकीचा आढावा घेत आहेत. याला काय म्हणावे, असा गंभीर प्रश्न शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांना केला आहे.

राऊत यांच्या या टीकेमुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा चांगलाच जळफळाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेते त्याला काय उत्तर देतात की, त्याकडे दुर्लक्ष करतात हा उत्सुकतेचा विषय आहे.

केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा नाशिक दौरा विविध अर्थाने चर्चेत आहे. आजच्या बैठकीत शहा उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांसह सात मंत्री उपस्थित राहणार आहेत.

भाजपची ही बैठक विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य ठरली आहे. त्यावर शाह यांना देशाचे गंभीर प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत. मणिपूर राज्यात प्रचंड असंतोष आहे. सैन्याला हस्तक्षेप करावा लागतो आहे. मणिपूरमध्ये भारतीय सैन्याने प्रवेश केला आहे.

अशावेळी गृहमंत्री अमित शाह हे मात्र देशातील या गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न न करता संरक्षण विभागाच्या विमानाने निवडणूक तयारीच्या दौरे करीत आहेत. हे अन्य कोणी केले असते तर भाजपने त्यावर किती आग पाखड केली असती असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला

मणिपुर, काश्मीर, लदाख येथे सैन्य घुसले आहे त्याचा आढावा अद्याप घेतलेला नाही अरुणाचल प्रदेश मध्येही अशीच असते त्याचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला नाही मात्र महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी मतदारसंघांचा आढावा घ्यायला संरक्षण विभाग खात्याचे विमान घेऊन गृहमंत्री फिरत आहेत हे मला मजेशीर वाटते

गृहमंत्री येणार म्हणजे काय होणार? असे अनेकांना वाटते. गृहमंत्री आले म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दम भरणार. आगामी निवडणुकीत आमच्या बाजूने राहा, असे सांगणार. गृहमंत्री आले की, प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचे काम करतात.

गेल्या दहा वर्षाचा आमचा अनुभव असाच आहे, असे राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी असेच राष्ट्रीय कार्य केले? त्यामुळे ते सत्तेवर येऊ शकले. मला या दौऱ्याची जास्त चिंता वाटते. कारण मोदी, शाह येतात तेव्हा महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातात. नाशिकच्या लोकांनी त्यामुळे सावध राहावे.

महाराष्ट्राला धोका कोणी दिला? हे महाराष्ट्र जाणतो. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यामुळे भाजपचा हिशेब चुकता केलेला आहे. स्वतः शाह यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेला धोका दिलेला आहे.

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या पवित्र खोलीत त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्या चर्चेबाबत शाह यांनी घुमजाव केले. शिवसेनेची धोकेबाजी केली. त्याचा हिशेब आता आम्ही चुकता केला आहे, असाही टोमणा राऊत यांनी मारला

महाराष्ट्राची निवडणूक आता भाजपच्या हातून गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य कोणीही दौरे केले तरी काही फरक पडणार नाही. हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये भाजपचा पराभव होताना दिसतो आहे. भाजप जेव्हा महाराष्ट्रात पराभूत होईल, तेव्हा मोदी यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरून पाय उतार करण्याची तयारी सुरू झालेली असेल. असा दावा खासदार राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT