Shiv Sena UBT Crisis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena UBT Crisis : ठाकरेंना मोठा धक्का? ‘ऑपरेशन टायगर’ची गरजच नाही, लोक स्वतःहून येतायत; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा

Sanjay Shirsat claims Uddhav Thackeray faction leaders are joining Eknath Shinde Sena on their own, says Operation Tiger no longer needed : साताराहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना मंत्री संजय शिरसाट काही काळ अहिल्यानगर इथल्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते.

Pradeep Pendhare

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठाकरेंच्या पक्षातील लोक फोडण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याची गरज उरलेली नाही, कारण ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून एकनाथ शिंदे शिवसेनेकडे येत आहेत, असा मोठा दावा शिरसाट यांनी केला.

साताराहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना मंत्री शिरसाट (Sanjay Shirsat) काही काळ अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड आणि नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर थेट हल्लाबोल केला.

दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने (Shivsena UBT) त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, “हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे”, असा टोला लगावत शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते पुढे म्हणाले की, “नेत्याचा आपल्या कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद असणं गरजेचं असतं. पण इथे तसं दिसत नाही. नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीलाही ते व्हिडिओ कॉन्फरन्सने उपस्थित राहिले. ते नेमकं कोणत्या कामात व्यस्त असतात हेच समजत नाही.”

मंत्री शिरसाट यांनी पुढे दावा केला की, “नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील नातं मजबूत असायला हवं. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की लोक स्वतःच पक्ष सोडत आहेत. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याची गरज नाही. लोक स्वतःहून ठाकरेंना सोडत आहेत. आता जे होईल ते लोकांच्या मनाने होऊ द्या.”

या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिरसाट यांच्या या विधानाने नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT