NCP MLA Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire Politics: आमदार सरोज अहिरे लागल्या कामाला, मतदारसंघात आणणार मोठा उद्योग!

Saroj Ahire; NCP Ajit Pawar`s MLA Saroj Ahire will give priority for a Big Industrial Project in Devlali Constiyuency-देवळाली मतदारसंघातील महायुतीतील विसंवादाचा सामना करीत विजयश्री खेचून आणलेल्या आमदार सरोज अहिरे यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत.

Sampat Devgire

Saroj Ahire News : निवडणुकीत विविध आश्वासने दिलेल्या आमदार सरोज अहिरे यांना दुसऱ्यांदा मतदारांनी संधी दिली आहे. या निवडणुकीत त्यांना अनेक राजकीय आव्हानांना सामोरे जावे लागले. विशेषतः पक्षांतर्गत व सहकारी पक्षांनीच त्यांना अडथळे आणले होते.

आमदार अहिरे यांनी निवडणुकीत विजयी झाल्यावर नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर मतदारसंघात परतल्यावर त्यांनी कार्यकर्ते तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत कामाला सुरवात केली आहे.

आमदार सरोज अहिरे दुसऱ्यांदा विजयी झाल्याने आता देवळालीला आदर्श मतदारसंघ अशी ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर लढविलेल्या निवडणुकीत त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हा मतदारसंघ हा ग्रामीण व शहरी अशी संमिश्र वस्ती असलेला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार निर्मिती व मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याला त्यांचे प्राधान्य असेल.

हे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षातील कामाचा अनुभव गाठीशी आहे. अनेक नागरिक तसेच सहकारी यांची मला साथ आहे. या कालावधीत विविध विकासकामे मंजूर आहेत. ती सर्व कामे पूर्ण करण्यासाठी काम सुरू केले आहे. जास्तीत जास्त कामे मंजूर करून विकसित मतदारसंघ अशी ओळख निर्माण करण्यावर आपला भर असेल असे त्यांनी कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेत सांगितले.

संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी त्र्यंबकेश्वरला दरवर्षी काढण्यात येते. तसेच राज्यभरातून वारकरी येथे येतात. या वारकरी तसेच भाविकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजन करण्यात येईल. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपण सर्वांशी चर्चा सकूर काही महत्त्वाची कामे करण्यावर भर देऊ. त्यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी मिळवू, असेही आमदार अहिरे यांनी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सांगितले.

या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये शेती, शिवारातील रस्त्यांचे जाळे निर्माण करायचे आहे. राजुर बहुला येथील औद्योगिक वसाहतीत मोठा औद्योगिक प्रकल्प यावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या निमित्ताने मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळेल. नवी गुंतवणूक आल्याने विकासाला चालना मिळेल. त्या माध्यमातून विविध अनुषंगीक प्रकल्प देवळाली मतदारसंघात येतील. या मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे आगामी कालावधीत मतदारसंघात मोठा प्रकल्प आणण्यावर भर देण्यासाठी आमदार अहिरे यांना प्रयत्न करावे लागतील.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT