Sheetal Nandan
Sheetal Nandan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Corruption; भ्रष्टाचारामुळे ताहराबाद सरपंच शीतल नंदन ठरल्या अपात्र

Sampat Devgire

ताहराबाद : (Nashik) ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी शासनाकडून (Maharashtra Government) आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे तपासणी अहवालात सिद्ध झाले. त्यामुळे सरपंच शीतल योगेश नंदन (Shital Nandan) यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय आयुक्त (revenue commissioner) राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी हा निर्णय दिला. (Women Sarpanch disqualified in Nashik District)

विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाने पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. महिला सरपंच अपात्र ठरल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत विरोधी गटाकडून गेले दोन वर्षे पाठपुरावा सुरु होता. या निर्णयाने अन्य सरपंच सावध झाले आहेत.

भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या ताहाराबाद ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये खोटी बिले सादर करून कामे न करता निधीचा अपहार झाला आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निधीची अफरातफर आढळली होती.

याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची तपासणी केली जात होती. तसेच यापूर्वी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका विद्यमान सरपंच शीतल योगेश नंदन यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी करत त्यांच्या विरुद्ध जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

विभागीय आयुक्त कार्यालयात या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीमध्ये सरपंच शीतल नंदन या दोषी आढळल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये सध्याच्या कार्यकालासाठी सरपंच व सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. तसा लेखी आदेश देखील बागलाण गटविकास अधिकारी, सरपंच शीतल नंदन व तक्रारदार यांना देण्यात आला आहे.

इतर सरपंचाचे धागे दणाणले

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील सरपंचांना अपात्र ठरलेल्यामुळे महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी दिलेल्या १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये कामे करतांना चाकोरी बद्ध पध्दतीने करावी लागणार आहेत. यापुर्वी झालेल्या कामांची विरोधक तक्रार करणार नाहीत याची काळजी सरपंचांना गावपातळीवर घ्यावी लागणार आहे. मात्र तालुक्यातील ताहाराबाद या मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अपात्र ठरवल्यामुळे इतर गावांच्या सरपंचांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून सरपंचांच्या गैरकारभारा विरूद्ध वस्तूनिष्ठ तक्रारी सादर केल्या होत्या. न्याय देवतेवर विश्वास असल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला.

- सुभाष नंदन, तक्रारदार, तालुकाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT