Sharad Pawar Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raver Loksabha 2024 : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाने शरद पवार नाराज? मोठ्या नेत्याने सांगितली 'अंदर की बात'

Eknath Khadse News : खडसेंनी आजारापणाचे कारण पुढे करत निवडणुकीच्य रिंगणातून माघार घेतली. त्यांना पक्ष प्रवेश देण्या ऐवजी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी होती. ती जर दिली असती तर जिल्ह्यात पक्षाची ताकद चार पटींनी वाढली असती.

Roshan More

Loksaba Election 2024 News : रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसे हे शरद पवार गटाकडून उमेदवार असतील अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी आजारपणाचे कारण देत माघार घेतली. त्यानंतर शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.

दरम्यानच्या काळात एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. पण खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये NCP प्रवेश देऊन चूक झाल्याची कबुली शरद पवार यांनी दिल्याची माहिती माजी मंत्री सतीश पाटील यांनी दिली.

खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षप्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळेल उलट पक्षाचेच नुकसान झाल्याची टीका सतीश पाटील यांनी केली. खडसे हे स्वार्थासाठी राष्ट्रवादीमध्ये येत असल्याचे त्यावेळीच मी शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितले होते, असे देखील सतीश पाटील म्हणाले.

खडसेंनी आजारापणाचे कारण पुढे करत निवडणुकीच्य रिंगणातून माघार घेतली. त्यांना पक्ष प्रवेश देण्या ऐवजी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी होती. ती जर दिली असती तर जिल्ह्यात पक्षाची ताकद चार पटींनी वाढली असती आणि उमेदवार शोधण्याचा त्रास झाला नसता, असे देखील पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपण स्वगृही म्हणजे भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले होते. आपल्या कठीण काळात शरद पवार यांनी आपल्याला संधी दिली असे खडसे म्हणाले होते.

एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी त्यांच्या कन्या रोहिणा खडसे मात्र शरद पवारांची साथ देणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढण्यास त्या इच्छुक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT