satyajeet tambe,  Manas pagar
satyajeet tambe, Manas pagar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra MLC Election Results : मोठी बातमी : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का..

सरकारनामा ब्युरो

Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet tambe)आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात प्रामुख्याने ही लढत होत आहे. मतमोजणीस सुरु असताना एक दुःखद घटना समोर आली आहे.

सत्यजीत तांबे यांच्यावर मतमोजणीच्या दिवशीच दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गेली पंधरा दिवस त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे, त्यांचे जीवलग मित्र मानस पगार यांचे काल (बुधवारी) रात्री अपघाती निधन झाले. याबाबत सत्यजीत तांबे यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे. मानस पगार यांना त्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष होते. समाजमाध्यमांवर पगार यांच्या अपघातावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज मतमोजणी असल्याचे मानस पगार हे आपल्या काही मित्रासोबत नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे. मतमोजणीस सुरवात झाली आहे. विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल सांयकाळपर्यत जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतमोजणीस सुरवात झाली असून सध्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येत आहेत. वैध मते किती निघणार यावरुन या निवडणुकीत विजयाचे गणित बदलणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्याचे लक्ष आहे. अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागो गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे.

SCROLL FOR NEXT