Coal mining Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shocking: वीज निर्मिती केंद्राच्या आयात कोळशात घोटाळ्याचा संशय!

वीज निर्मितीत निकृष्ठ कोळशामुळे व्यत्य तरीही चार वर्षांत एकही रेक ‘रिजेक्ट’ नाही

Sampat Devgire

नीलेश छाजेड

नाशिक: औष्णिक वीज केंद्रात प्रामुख्याने (NTPS) मुख्य इंधन (Fuel) म्हणून कोळशाचा (Coal) वापर केला जातो. यात भारताच्या (Country) विविध भागांतून आलेला कोळसा तसेच आयात केलेला कोळसा वापरून वीजनिर्मिती (Electricity Generation) केली जाते. आयात कोळशात वाहतूक, वजन व गुणवत्ता तपासणीत दोषी कोळसा पुरवठाधारकांवर केवळ दिखाव्यासाठी दंडात्मक (Only charge Fine) कारवाया केल्या जात असून, एकदाही कोळसा ‘रिजेक्ट’ (No rejection) न झाल्याने कोळसा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. (There were no rejection of low quality coal import from various parts)

या घोटाळ्यात दलालाची (लायझनिंग एजन्ट) महत्त्वाची भूमिका अधिकृत खासगी टेस्टिंग एजन्सीचे संबंधित लोकांचा सहभाग असल्याची चर्चा अधिकारी व कर्मचारी वर्गात आहे.

निष्कलंक प्रतिमा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अजून पूर्णवेळ ऊर्जामंत्री नसल्याने अधिकारी, एजन्सी व दलालांचे चांगलेच फावले आहे. राज्यातील सात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मितीसाठी भारतीय कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. मात्र, उष्मांक वाढीसाठी इंडोनेशिया, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांतून कोळसा आयात केला जातो.

वीजनिर्मितीसाठी ८०-९० टक्के भारतीय कोळसा १० ते २० टक्के आयात कोळसा मिसळून वापरला जातो. आयात कोळशाची गुणवत्ता अधिक असली तरी ब्लेंडिंगचे प्रमाण चुकले, तर अधिक उष्मांकाने बॉयलर ट्यूबला इजा पोहचण्याची भीती असते, तसे होऊ नये म्हणून भारतीय कोळशाचे प्रमाण व इम्पोर्ट कोलचे प्रमाण योग्य ठेवावे लागते.

आयात कोळशात उच्च कार्बन घटक अधिक, एकूण आर्द्रता कमी आणि सल्फर व राखेची निर्मिती कमी होत असल्याने त्याचा उपयोग केला जातो, जेणेकरून उष्णांक वाढवला जातो. शासकीय निकषांनुसार आर्द्रता आयात कोळशाची आर्द्रता ही २६ टक्के असणे आवश्यक असते, असे असताना आयात कोळसा रेल्वेमध्ये लोड करताना अतिप्रमाणात पाण्याचा वापर करून कोळसा भिजवला जातो. यामुळे नक्कीच आर्द्रता वाढत असली तरी तपासणी अहवालात फेरफार करून २६ टक्क्यांच्या आसपास का दाखवली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोळशात सल्फरचे प्रमाण ०.६ टक्के असणे बंधनकारक आहे, हेच प्रमाण ०.९ च्या वर गेलेला कोळसा व अमेरिकन स्टॅन्डर्ट ऑफ टेस्टिंग मटेरिअलनुसार फाइन्सचे प्रमाण आठ नंबरच्या चाळणीतून ०-२.३६ एमएम ते २५ टक्के असणे बंधनकारक आहे. त्यापुढील कोळसा रिजेक्ट केला जातो. तसे आढळले तर नावापुरती दंडात्मक कारवाई करून कोळशाचा वापर केला जातो. मात्र, आतापर्यंत एकही रेक रिजेक्ट केला गेला नसल्याचे खुद्द वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार २०१४-१५ मध्ये कोळशाची आयात थांबविण्यात आली होती. सध्या महाराष्ट्रातील नाशिक, भुसावळ, खापरखेडा, कोराडी व चंद्रपूर येथे आयात कोळसा येत आहे.

वॉश कोल म्हणजे काय?

भारतीय कोळसा खाणीतून आलेला कोळसा वॉश करून वापरण्याचे निकष आहेत. कोळसा वॉश करताना माती-दगड बाजूला काढण्यासाठी पाणी आणि रसायनांचा वापर केला जातो. कोळसा वापराअगोदर सल्फर व अशुद्ध घटक बाजूला करणे आवश्यक असते, असे असताना केवळ २० ते ३० टक्के कोळसा वॉश केला जात असल्याने तपासणी एजन्सीकडून सर्रास कानाडोळा केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उदाहरणादाखल...

भारतीय कोळसा वापर जानेवारी ते जूनपर्यंत सुरू असताना व आयात कोळसा ब्लेंडिंग करून जुलै ते ऑक्टोबरदरम्यान वापरताना पी एल एफ (प्लांट लोड फॅक्टर) मधली तफावत

जानेवारी ते जूनदरम्यान कोराडी वीज केंद्र जानेवारी-७४.४४८ टक्के, फेब्रुवारी-७६.१५१टक्के, मार्च-७८.६६४ टक्के, एप्रिल-७०.२१४ टक्के, मे-८०.९४ टक्के, जून-७०.३४१, जुलै ते ऑक्टोबरची तफावत

जुलै-४०.५६८ टक्के, ऑगस्ट-३५.४४२ टक्के, सप्टेंबर- ४७.८१२ टक्के, ऑक्टोबर-६६.४१६ टक्के अशीच तफावत इतर चार वीज केंद्रांतील पीएलएफमध्ये आहे.

कंपनीच्या निकषाप्रमाणे आयात कोळशाची तपासणी व रिजेक्शनचे अधिकार हे सर्वस्वी संबंधित वीजनिर्मिती केंद्राला आहेत. राज्यातील सातपैकी पाच औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना आयात कोळसा पुरवठा करण्यात आला आहे.

राजेश पाटील, कार्यकारी संचालक, कोल

...

इम्पोर्ट कोल तपासणीच्या कामातच घोटाळा आहे व खासगी प्रयोगशाळा या भ्रष्टाचाराच्या मूळ आहेत. त्यांच्या अहवालाद्वारेच कोळसा खरेदी केला जातो. यातील घोटाळा थांबला, तर व या निविदांव्यतिरिक्त अजून ५० टक्के वाढीव कोळसा थांबविला, तर निश्चितच सामान्य नागरिकांवरचा वीज दराचा भर कमी होईल.

-संतोष फताटे, कोळसा खणीकर्मतज्ज्ञ.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT