शालार्थ आयडी घोटाळ्यात 841 बनावट शिक्षक नियुक्त्यांचा आरोप.
महत्त्वाची कागदपत्रे न मिळाल्याने पोलिसांच्या तपासाला अडथळा
चार जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
संजय गरुडसह संशयितांवर कारवाई; शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह.
Nashik News: राज्यभर गाजलेल्या 160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील कागदपत्र शिक्षण विभागाने दडवल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीस तपास गोल गोल फिरत असल्याचे चित्र आहे.
शालार्थ आयडी घोटाळा 160 कोटी रुपयांचा आहे. नियुक्त्या नसतानाही शिक्षकांना लाखो रुपयांचे अनुदान व वेतन वितरित करण्यात आले. यामध्ये शिक्षण विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली.
या घोटाळ्यातील 841 शिक्षकांची बनावट नियुक्ती झाली. येथील बहुतांशी शिक्षक धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील आहेत. मात्र पोलिसांच्या तपासासाठी शिक्षण विभागाकडून कागदपत्र उपलब्ध करण्यात आलेली नाहीत.
पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याने गंभीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले.
विशेष म्हणजे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय या प्रकरणात अडकले आहेत. यातील संशयित संजय गरुड याला 27 जुलैला अटक झाली. मात्र कोठडीत न ठेवता थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भाजप नेता गरुड याचा भाऊ दिलीप गरुड सध्या कारागृहात आहे. संजय गरुड मात्र गेल्या 25 दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. गरुड हा या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला राजकीय नेता आहे.
शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या प्रकरणाला शिक्षण विभागाच्या प्रशासनाचीच फूस नाही ना? अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित शिक्षक आणि खोटे अनुदान मिळविणाऱ्यांची नियुक्ती व अन्य कागदपत्र शिक्षण विभागाने दडवली असा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिसांनी चारही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.