Shalarth ID scam education officers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shalarth ID Scam : एसआयटीच्या नोटीसमुळे मुख्याध्यापक गायब? 160 कोटी घोटाळा तपासाची व्याप्ती वाढली!

Headmasters Notices SIT : एसआयटीच्या पाच पथकांनी चाळीसगाव, अमळनेर व चोपडा तालुक्यांतील शाळांची तपासणी केली. दरम्यान, संशयित मुख्याध्यापक गायब असल्याची चर्चा आहे.

Sampat Devgire

Nashik News : राज्यभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या 160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. नाशिक पोलिसांच्या एसआयटीने याबाबत तपासाची व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे संस्थाचालकांसह मुख्याध्यापकांची ही झोप उडाली आहे.

घोटाळ्यातील तपासात आता थेट शाळांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. पोलिसांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यासाठी जळगावच्या विविध शाळांना टार्गेट करण्यात येणार आहे.नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून विविध मुख्याध्यापकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमुळे अनेक मुख्याध्यापकांचे धाबे दणाणले आहे.

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी चाळीसगाव, अमळनेर व चोपडा तालुक्यांतील शाळांची तपासणी केली. पथकांनी मूळ फाइल्स, हजेरी पट, वेतन देयके, नियुक्तीपत्रांसह आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली. दरम्यान, सर्वाधिक संशयित असलेल्या अमळनेर तालुक्यात तसेच साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात पथक येण्यापूर्वीच मुख्याध्यापक गायब असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधितांना आता थेट अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या संशयितांच्या अर्जावर ५ व १४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या या घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बनावट आयडी निष्पन्न झाल्याने नाशिक पोलिस आयुक्तालयाने उत्तर महाराष्ट्रातील तपासासाठी एक मुख्य व १० सहायक अशी ११ विशेष पथके तयार केली आहेत.

उपायुक्त चव्हाण पथकांचे प्रमुख

पथकात ४६ अधिकारी व ८६ पोलीस अंमलदार, असे एकूण १३२ जण आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू आहे. उपायुक्त किरणकुमार चव्हाण मुख्य व सहायक पथकांचे प्रमुख आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात २०२५ आणि २०२६ मध्ये या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT