MLA Seema Hiray, Pradip Peshkar & Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Seema Hiray Politics: निरीक्षकांच्या `या` गुगलीने आमदार सीमा हिरे समर्थकांची उडाली धावपळ, केली फोनाफोनी?

Sampat Devgire

Nashik Political News: भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत दुधाने पोळला. त्यामुळे आता तो ताकही फुंकून पीत आहे. किमान कार्यकर्त्यांमध्ये तरी तसा संदेश देण्याचा नेत्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.

भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी जोरदार सुरू आहे. त्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये यंत्रणा काम करीत आहेत. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्याही स्थितीत सर्वाधिक जागा जिंकायच्याच असा निर्धार या पक्षाने केला आहे.

त्याची जाणीव काल नाशिकच्या आढावा बैठकीत झाली. या बैठकीसाठी नाशिक पश्चिम मतदार संघासाठी नंदू महाजन हे निरीक्षक होते. त्यांनी उपस्थितांशी अतिशय बारीक सारीक तपशीलावर चर्चा केली. चाचपणी केली.

काल झालेल्या बैठकीत निरीक्षकांनी अतिशय तपशीलवार विवेचन केले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येणे कसे आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा थेट परिणाम केंद्र सरकारवर होणार आहे. भाजप आगामी काळात अधिक दमदार वाटचाल करणार आहे.

त्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली. जनमानसावरी या निर्णयांचा कसा अनुकूल परिणाम झाला आहे, हे देखील निरीक्षकांनी सांगितले.

विरोधी पक्ष भांबावलेला आणि अती आत्मविश्वासात वावरतो आहे. त्यामुळे भाजपला ही निवडणूक सोपी आहे, असे एकंदर चित्र या बैठकीत रंगविण्यात आले. आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या अविर्भावात वावरत आहेत.

त्याला मोठा धक्का देण्याचे काम काल पक्षाच्या निरीक्षकांनी केले. रात्री अचानक मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तीन नावे सुचवावेत, असे मतदान घेण्यात आले. ही घोषणा झाल्यानंतर नाशिक पश्चिम मतदार संघातील आमदार सीमा हिरे आणि अन्य इच्छुकांची अक्षरशः धावपळ उडाली.

यावेळी आमदार हिरे यांच्या समर्थकांनी अनेकांना दूरध्वनी करून आपले नाव सुचवावे, असे सांगितल्याचे बोलले जाते. मतदार संघात भाजपकडे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयार आहेत.

यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव, इंजिनिअर दिलीप भामरे, प्रदीप पेशकार, दिनकर पाटील आणि विद्यमान आमदार सीमा हिरे यांचा त्यात समावेश आहे. यातील इच्छुक हे अतिशय जोमाने कामाला लागलेले आहेत.

या इच्छुकांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध देखील आहेत. त्यातून सातत्याने लॉबिंग करण्याचे काम या मतदारसंघात होत आहे. मंगळवारी निरीक्षकांकडून मतदानाची घोषणा झाल्यानंतर प्रदीप पेशकार, दिनकर पाटील व अन्य इच्छुकांच्या समर्थकांनी आपल्या कार्यकर्त्यांना नावे सुचविण्यासाठी फोन केल्याची माहिती मिळाल्यावर आमदार हिरे यांच्या समर्थक देखील अचानक सक्रिय झाले.

एकंदरच पक्षाच्या कार्यालयात मतदान सुरू होते. दुसरीकडे पश्चिम मतदार संघातील इच्छुकांची पुन्हा कोणी सुरू होते. या सर्व धावपळीत उमेदवारीचे काय होणार? अशी चिंता इच्छुकांनी विद्यमान आमदारांच्या मनात निर्माण झाली. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पक्षाच्या या नव्या डावामुळे विद्यमान आमदारांची झोप उडाली, एव्हढे मात्र खरे. आता हे निरीक्षक काय अहवाल देतात. पक्ष काय निर्णय घेतो. याची उत्सुकता या इच्छुकांना लागून राहिली आहे. हे इच्छुक आता अधिक जोमाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदार अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. भाजपने पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमचे मतही विचारात घेतले जाते, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एकंदरच मतदानाच्या गुगलीने पश्चिम मतदार संघाच्या आमदार हिरे यांची झोप उडाली असावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT