Girish Mahajan & Kishor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Politics: निवडणुकीआधीच महायुती फिस्कटली, भाजपला आव्हान देत आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारही जाहीर केले!

Self-reliant of Mahayuti in Jalgaon, Shivsena Shinde's party has announced its candidacy in Pachora, Jalgaon Mahayuti slipped away?-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणतात, अपवादात्मक स्थितीतच मैत्रीपूर्ण लढती होतील.

Sampat Devgire

Mahayuti News: महायुतीच्या मंत्र्यांमध्ये वर्चस्वावरून मतभेद वाढू लागले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीच महायुतीत फटाके वाजले. ही एकमेकांच्या उमेदवारांचा गेम करण्याची पडद्यामागून खेळी तर नाही ना? अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम राहील असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीच भूमिका जाहीर केली आहे. प्रत्यक्षात मात्र महायुतीतील मंत्र्यांना आता स्वबळाचे वेध लागले आहेत.

भाजपचे संकटमोचक असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पडद्यामागे स्वबळाची तयारी केली आहे, असा आरोप महायुतीचेच मंत्री करीत आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसे संकेत दिले जात आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दोघेही अस्वस्थ आहेत.

भाजपने विधानसभा निवडणुकीतही वेगळा खेळ केला होता. याचाने अनुभव असल्याने महायुतीची वाट न पाहता आमदार किशोर पाटील यांनी महायुती तोडण्याची घोषणाच करून टाकली. एवढ्यावर न थांबता भडगाव नगरपरिषदेचा उमेदवारही त्यांनी जाहीर केला.

पाचोरा- भडगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला अपक्ष उमेदवार उभा केला होता. त्याला टेबलाखालून भरपूर मदतही केली होती. एकदा नव्हे तर असे दोन वेळा झाले आहे. त्यामुळे राज्यात काहीही असले तरी या मतदारसंघात शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवेल, अशी घोषणा आमदार पाटील यांनी केली आहे.

भडगाव नगरपरिषद अध्यक्षपदासाठी त्यांनी रेखा प्रदीप मालवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पाचोरा नगराध्यक्षपदासाठी माझी मुलगी किंवा पत्नी उमेदवार असतील. याबाबतची घोषणा येत्या एक नोव्हेंबरला स्वतःच्या वाढदिवशी करणार, असे पाटील यांनी घोषित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी देखील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे म्हटले आहे. आम्ही त्याची तयारी करणार आहोत. वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय आहे, याची वाट पाहणार आहोत.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी याबाबत विविध विधाने केली आहे. यामध्ये निवडणुकीत उमेदवारी आणि जागावाटप दोन्हींमध्ये महायुतीत एकमत होण्याची शक्यता धूसर सर झाली आहे. निवडणुकीआधीच फटाके वाजल्याने जळगाव जिल्ह्यात महायुतीची शक्यता मावळल्यात जमा आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT