Congress agitation in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हाकलून द्या!

नाशिक शहरात काँग्रेसकडून राज्यपाल कोश्‍यारी, त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत ‘जोडे मारो’ आंदोलन.

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्राचे (Maharashtra) आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ नाशिक (Nashik) शहर जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीकडून राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी (Governer Bhagatsingh Koshyari) व भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी पक्षाकडून या दोघांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. (Congress protest Governer & BJP spoaksperson in Nashik)

गेले काही दिवस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्याचे पडसाद रोज पडत आहेत. याबाबत निषेधाचे आंदोलन थांबण्याची चिन्हे नाहीत. जिल्ह्यात जवळपास सर्वच शहर व तालुक्यांत सातत्याने आंदोलन होत आहे. त्यामुळे रोज होणाऱ्या आंदोलनांमुळे तापलेले वातावरण थंडावण्याची चिन्हे नाहीत.

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी व भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून काँग्रेस भवनासमोर मंगळवारी दुपारी निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी व भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडो जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची माफी मागून राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून देण्याची मागणी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही तर नाशिक जिल्हा बंद आंदोलन काँग्रेसकडून करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल, अनु. जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलक, अनु. जाती विभागाचे ज्ञानेश्वर काळे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर, सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर, सुरेश मोरे, ज्यूली डिसूझा, अविनाश गांगुर्डे, संतोष ठाकूर, संतोष डबीर, युवक काँग्रेसचे स्वप्नील पाटील, शरद बोडके, गौरव सोनार, आकाश घोलप, देवा देशपांडे, इसाक कुरेशी, दाऊद शेख, देवेन मारू, शब्बीर पठाण, गोपाळ जगताप, अॅड. सागर वाहूळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT