Jayprakash Chhajed
Jayprakash Chhajed Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress; ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश जितमल छाजेड (वय ७६) (Jayprakash Chhajed) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. आज (ता.११) दुपारी अडीचला काँग्रेस भवनात श्री छाजेड यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. (Ex MLC Jayprakash Chhajed is a senior congress leader)

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्याशी श्री छाजेड यांचे मैत्रीचे संबंध राहिले. नाशिकमध्ये काँग्रेसच्या वैभवाच्या काळात माजी खासदार मुरलीधर माने आणि श्री छाजेड यांनी संघटनात्मक धुरा सांभाळली होती.

(कै) संजय गांधी यांच्या गटाचे आक्रमक युवा नेतृत्व म्हणून 1975 च्या सुमारास ते विशेष चर्चेत आले होते. यावेळी त्यांनी तरुणांचे संघटन निर्माण करुन प्रस्थापित व ज्येष्ठ नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची गोल्फ क्लब मैदानावर श्री छाजेड यांच्या पुढाकारातून सभा झाली होती.

श्री छाजेड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मध्यतंरी, मुंबईतील रुग्णालयात इलाज घेत असताना इंटक संघटनेत घडामोडी झाल्यात. रुग्णालयातून परतल्यावर त्यांनी इंटक ची धुरा समर्थपणे सांभाळली होती. श्री छाजेड यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते.

दरम्यान, श्री छाजेड यांच्यासमवेत नातू होता. श्री छाजेड यांच्या निधनाची माहिती मिळताच, नातेवाईक गुजरात, पुणे आणि लंडन मधून नाशिककडे निघाले आहेत. श्री छाजेड यांच्या मागे पत्नी नाशिकच्या माजी उपमहापौर तथा काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा, नामको बँक संचालिका शोभाताई, मुलगा प्रीतिश, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आकाश, आशिष, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेस भवनातील अंत्यदर्शन नंतर श्री.छाजेड यांची अंत्ययात्रा निघेल. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT