Raosaheb Danve & Pankja Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankja Munde: पंकजा मुंडे यांच्या नाराजीची पक्षश्रेष्ठी दखल घेतील

पंकजा मुंडे या ज्येष्ठ नेत्या असल्याने मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात त्यांचा विचार होऊ शकतो.

Sampat Devgire

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या पहिल्या मंत्री मंडळाच्या यादीत पंकजा मुंडे (Pankja Munde) यांना स्थान न मिळाल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी फुंकर घातली. त्या ज्येष्ठ नेत्या असल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा पक्षश्रेष्ठी जरूर विचार करतील. लवकरच मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (BJP leaders will take cognizance of Pankaja Munde`s disfavour)

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला आज भेट दिली. त्यानंतर भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने १८ मंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्याने त्यांनी `कदाचित माझी पात्रता नसेल` असे वक्तव्य करून नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर श्री दानवे यांना विचारले असता, पंकजा मुंडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा यावर पक्षश्रेष्ठी विचार करतील असे सांगितले.

दरम्यान स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत केंद्रीय मंत्री जात आहेत. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर सावरकरांनी ज्या काळ कोठडीत शिक्षा भोगली तेथील दर्शन भगूरच्या ७५ नागरिकांना घडविले जाणार असल्याची माहिती श्री दानवे यांनी दिली

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT