Bazar Samiti Result :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bazar Samiti Result : पठ्ठ्याने करून दाखवलं; शहाद्यात नवख्या पॅनलपुढे भाजपच्या दिग्गजांचा सुपडा साफ !

Shahada Bazar Samiti Result : भाजपचे पडले दोन गट, दोघांतच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ..

सरकारनामा ब्यूरो

Vijaykumar Gavit News : शहादा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचेच दोन गट पडले पडल्याचे दिसून आले. यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता होती. याचे चित्र आता निकालात स्पष्ट दिसून येत आहे. भाजपमध्येच दोन गट पडल्याने त्याचा फायदा स्थानिक पातळीवरील शेतकरी विकास पॅनलला झाला आहे.

शहादा बाजार समितीच्या निवडणुकीतमध्ये मंत्री आणि आमदारांच्या प्रस्थापित पॅनलला आश्चर्यकारक मोठा धक्का देत, स्थानिक नेते जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे माजी सदस्य अभिजीत पाटील यांचा शेतकरी विकास पॅनलला १० जागांवर विजय मिळाला आहे. उर्वरित सहा जागांवर मतमोजणी सुरू आहे.

पालकमंत्री विजयकुमार गावीत (VijayKumar Gavit) यांच्या भाजप पुरस्कृत पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तर स्थानिक आमदार राजेश पाडवी यांच्या गटाला ३ जागांवर समाधान मानावे लागले. शहादा बाजार समितीच्या निवडणुकीतमध्ये मंत्री आणि आमदारांच्या प्रस्थापित पॅनलला आश्चर्यकारक मोठा धक्का देत स्थानिक नेते व माजी जिल्हा परिषद कृषी समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलला १४ जागांवर विजय मिळाला आहे.

हा निकाल राज्याच्या एकूणच जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल, असे सांगितले जाते. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये शहादा बाजार समितीत भाजपला मोठा धक्का बसला, तर नवख्या शेतकरी पॅनलला लोकांनी स्वीकारले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT