MLC Amrishbhai Patel & MLA Kanshiram Pawara
Sarkarnama
शिरपूर : धुळे जिल्ह्यात विविध रस्त्यांची दुरावस्था आहे. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर शहादा-शिरपूर (Shirpur) मार्गासह विविध रस्त्यांसाठी १८.७५ कोटींचा निधी मंजूर झाल्याने या रस्त्याचे भाग्य उजळळ्याची नागरिकांत चर्चा सुरु झाली. या रस्त्यांसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) आणि आमदार काशिराम पावरा (Kashiram Pawara) यांनी पाठपुरावा केला.
आमदार पटेल यांच्या प्रयत्नांती अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर शहादा-शिरपूर रस्त्यासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत ५ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला. शिरपूर- शहादा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने दुरुस्तीसाठी निधी मिळविला. पुढील आठवड्यात या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. वर्षानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे. पुरवणी अर्थसंकल्पात शिरपूर तालुक्यातील विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम, आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी निधी समाविष्ट झाला आहे.
विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मिळालेला निधी असा : तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर रस्ता, एक कोटी ९९ लाख; तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर रस्ता, एक कोटी ९९ लाख; राज्य महामार्ग ते गलंगी फाटा, ८२ लाख; एकूण चार कोटी ८० लाख; शहादा, सांगवी, हातेड रस्ता, दोन कोटी (बोराडीजवळ); शहादा, सांगवी, हातेड रस्ता (जोयदा ते खंबाळे, खामखेडा ते सत्रासेन फाटा), तीन कोटी ७० लाख; रामा ते पळासनेर, हाडाखेड, जामफळ रस्ता (पळासनेर गावातील लांबी व हाडाखेड ते सुळे), दोन कोटी; एकूण बिगर आदिवासी क्षेत्रासाठी- सात कोटी ७० लाख, शिरपूर तालुका आदिवासी क्षेत्र- एकूण ५ कोटी ६० लाख, बोराडी या रस्त्यांचा समावेष आहे.
याबरोबरच न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर येथे लादीमोरी बांधकामासाठी दहा लाख; बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर रस्ता-पुलास संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी दहा लाख; बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर रस्ता, लादीमोरी बांधकामासाठी दहा लाख; बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर रस्ता, लादीमोरी बांधकामासाठी दहा लाख; मोहिदा ते बटवापाडा रस्त्याचे नूतनीकरण आदींचा समावेष आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.