Officials investigate the Shalarth ID scam after 638 alleged bogus teachers were identified in Jalgaon, making it one of the biggest education fraud cases in Maharashtra. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

School ID Scam : धक्कादायक! घोटाळ्यातील ८४१ पैकी ६३८ बोगस शिक्षक जळगावचे? अटक होताच भाजप नेता रुग्णालयात!

Shalarth ID Scam Sanjay Garud: शालार्थ आयडी घोटाळ्यात आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या निवृत्त शिक्षण उपसंचालकाचाही समावेश आहे.

Sampat Devgire

Jalgaon fake teachers scam: राज्यभर गाजत असलेल्या 160 कोटींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील भाजप नेता आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती संजय गरुड यांना अटक झाली.

गरुड सोलापूर येथील फार्म हाऊस मध्ये चैनीत राहत होता. त्याला राजकीय नेत्याकडूनच आश्रय मिळाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी गरुडला ताब्यात घेताच त्याच्या छातीत कळ आली. त्यामुळे सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी चक्रे फिरवल्याने संजय गरुड यांच्या पाठोपाठ त्याचा भाऊ दीपक गरुड हा देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दीपक गरुड याला अटक झाली. त्याला आश्रय देणाऱ्या अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या निवृत्त शिक्षण उपसंचालकाचाही समावेश आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात ८४१ बोगस शिक्षकांची नियुक्ती झाली. यातील ६३८ बोगस शिक्षक एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. गरुड याच्या १५ शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजली, असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राजकीय कनेक्शनमुळे अडथळा?

विशेष तपास पथकाने संजय गरुड याला ताब्यात घेतच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. गरुड याचा विद्यमान मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी थेट संबंध आहे. त्यामुळे या तपासात पोलिसांना पुरेशी मोकळीक मिळाली नसल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT