Saroj Ahire
Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire : शरद पवारांना दगा देणाऱ्या सरोज अहिरे यांची आमदारकीची वाट बिकट?

Sampat Devgire

Nashik Political News : देवळाली विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांना शरद पवार गटाचे नेते लक्ष्मण मंडले आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. दोघांनीही विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे आता देवळालीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष आहे.

आमदार सरोज अहिरे Saroj Ahire या गेले काही वर्षे विधानसभेची उमेदवारी एवढेच ध्येय ठेवून काम करीत आल्या आहेत. 2019 मध्ये उमेदवारीसाठी त्यांनी एका रात्रीत भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप यांच्या विषयीच्या रागातून मतदारांनी अहिरे यांना भरभरून मतदान केले.

लोकसभा निवडणुकीनंतर देवळाली Deolali मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार अहिरे देखील तयारी करीत आहेत. त्यांना यंदा निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष्मण मंडले यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे.

मंडले 2019 च्या निवडणुकीसाठी सलग दोन वर्षे मतदारसंघात विविध कामांच्या माध्यमातून संपर्कात होते. मात्र सरोज अहिरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले. त्या आमदार त्यानंतर त्यांनी शरद पवार Sharad Pawar यांची मानसकन्या असे मतदारसंघात सगळीकडे सांगितले. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर सोयीनुसार त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील झाल्या. आता आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी त्या पुन्हा पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

सध्या मंडाले यांना दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी उमेदवारीसाठी संकेत दिले आहेत. मंडाले गेले काही दिवस मतदारसंघात जोरदार संपर्क करून विविध कामांच्या माध्यमातून चर्चेत आहेत. निष्ठावंत अशी प्रतिमा असलेले मंडले हे आमदार अहिरे यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

आमदार अहिरे सध्या महायुतीचा घटक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र अजित पवार Ajit Pawar गटाकडे सध्या नेत्यांची गर्दी आहे. कार्यकर्त्यांची उणीव आहे. मतदारांमध्ये शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती आहे. अशा परिस्थितीत महायुतीचे सहकारी पक्ष व नेते अहिरे यांना किती मदत करतात याची उत्सुकता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT