Gulabrao Deokar Criticized Shiv Sena Minister Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Deokar: गुलाबराव, मी भाजपला मदत केली असेल तर सिद्ध करा, राजकारणातून संन्यास घेईल; देवकरांचे आवाहन

Gulabrao Deokar Criticized Shiv Sena Minister Gulabrao Patil : आमच्या महाविकास आघाडीमध्ये गुलाबराव पाटील यांनी लावा लावी करायचं काम करू नये,अशा शब्दात देवकरांनी पाटलांना फटकारलं आहे.

Mangesh Mahale

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री, गुलाबराव देवकर यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. "देवकरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नव्हे तर महायुतीतील भाजपच्या उमेदवाराला मदत केली," असा आरोप पाटील यांनी केला होता. .त्याला देवकरांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

आमच्या महाविकास आघाडीमध्ये गुलाबराव पाटील यांनी लावा लावी करायचं काम करू नये,अशा शब्दात देवकरांनी पाटलांना फटकारवलं आहे. "मी जर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली असेल तर गुलाबराव पाटलांनी हे सिद्ध करावे राजकारणातून संन्यास घेईल," असे आवाहन देवकरांना पाटलांना केले आहे.

ते म्हणाले, "भाजपला मदत केल्याचा एक तरी पुरावा किंवा उदाहरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दाखवावं हे माझ्या संपूर्ण राजकीय जीवन थांबवतो," गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत देवकरांवर गंभीर आरोप केला होता.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील जळगाव आणि रावेर मतदारसंघाच्या निकालावर मोठं भाष्य केले आहे. ते म्हणाले, "भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटातील नेते गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली," असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची माजी मंत्री या नात्याने माझ्यावर जबाबदारी होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दोन्ही ठिकाणी प्रचारात किती मेहनत घेतली हे आमच्या नेत्यांना माहीत आहे.

मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत. मात्र त्यामुळे मी भाजपमध्ये जाईल असे नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही. मी शरद पवार यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी त्यांच्यासोबतच राहिल, असे गुलाबराव देवकरांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT