Manikrao Kokate & Sharad Pawar Supporters Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Crisis Sinnar: `राष्ट्रवादी` सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेंना आव्हान देईल?

Sampat Devgire

Manikrao Kokate News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. सिन्नर मतदरासंघातीलशरद पवार समर्थक संघटना बांधणीसाठी कंबर कसली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांना आव्हान देण्यासाठी आज त्यांचे शक्तीप्रदर्शन होत आहे. (Sharad Pawar Supporters organised for public meeting in Sinner of NCP)

सिन्नर (Sinnar) विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी विकासासाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार (Ajit Pawar) गटात सहभागी झाल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार (Sharad Pawar) समर्थकांनी त्यांना आव्हान देण्याची तयारी केली आहे.

याबाबत तयारीसाठी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये काल पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी आमदार कोकाटे यांच्यावर टीका केली. आगामी निवडणुकीत पराभवाची भीती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत आहे.

त्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार सुरू असल्याने लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले जात आहे. काही आमदार देखील स्वार्थासाठी त्याला बळी पडतात. नीष्ठा सोडून स्वार्थाचा विचार करतात. या सर्व गैरप्रकारांना जनता येत्या निवडणुकीत उत्तर देईल. जनता नीष्ठेचा विचार करील पैशांचा नव्हे.

सिन्नर मतदारसंघात सातत्याने पक्षांतराचे प्रयोग होत आले आहेत. अनेक निवडणुकीत आमदार सत्तेसाठी गैरप्रकार करतात. तालुक्यातील जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. जनता शरद पवार यांच्यासोबत आहे.

शरद पवार हे पुरोगामी विचारांचे नेते असून त्यांनी लोकशाही विरोधी व जनतेची दडपशाही करणाऱ्या भाजला कंटाळली आहे. भाजप जाती-जातीत, धर्मात वाद निर्माण करीत आहे. सिन्नरची जनता त्याला नक्कीच मतदानातून उत्तर देईल असा विश्वास शरद पवार समर्थकांनी व्यक्त केला.

सिन्नर येथे आज समर्थकांचा मेळावा होत आहे. जिल्हा अध्यक्ष गोकूळ पिंगळे, दत्तात्रय माळोदे, बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भिसे, डॉ. भरत गारे, पी. जी. आव्हाड, रवीद्र काकड, संदीप शेळके, दत्तात्रय डोंगरे यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याची तयारी करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT