Sharad Pawar Latest News in Marathi, Bhima Koregaon violence case
Sharad Pawar Latest News in Marathi, Bhima Koregaon violence case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शरद पवारांची `कोरेगाव भीमा`प्रकरणी ५ मे रोजी साक्ष

Sampat Devgire

मालेगाव : कोरेगाव भीमा पुणे (Pune) येथे १ जानेवारी २०१८ ला झालेल्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या भूतपूर्व न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सुमीत मलिक यांच्या चौकशी आयोगाने (Commission) काढलेल्या समन्सनुसार ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) साक्ष देण्यासाठी चौकशी आयोगासमोर ५ व ६ मेस हजर राहणार आहेत. (Sharad Pawar Latest News in Marathi)

कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आयोगाची ही साक्ष सह्याद्री राज्य विश्रामगृह मलबार हिल्स येथे होत आहे. देशाच्या राजकारणात प्रदीर्घ काळ कार्यरत राहून विविध विषयांवर स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या श्री. पवार यांची साक्ष होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकार सांगतात. श्री. पवार यांनी आयोगाने राज्यातील सर्व राजकीय नेत्यांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर निवेदन पुराव्याच्या स्वरूपात तपासणीत शपथेवर दाखल केले. (Bhima Koregaon violence case)

ॲड. प्रशांत पाटील (मुंबई) हे श्री. पवार यांच्यातर्फे कामकाज पाहत असून, महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. शिशिर हिरे काम पाहत आहेत.

श्री. पवार यांनी प्रतिज्ञापत्र व जादा प्रतिज्ञापत्र पुराव्यात दाखल केले आहेत. श्री. पवार यांची उलटतपासणी शासनातर्फे श्री. हिरे, एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान, विवेक विचारमंच पुणेचे वकील भारतीय जनता युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष ॲड. प्रदीप गावडे, पीडिताचे वकील बी. जी. बनसोडे, किरण चने, बामसेफचे किरण मकरे हे घेण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT