Ahilyanagar crime updates : भर दुपारी ग्रामसेवकाला बंदूक दाखवून गोळ्या घालण्याचा भाषा करत जीवे मारण्याची धमकीने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.
शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी दिलीप मिसाळ यांना ही धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. अहिल्यानगर शहरातील संदीप हाॅटेल समोर हा प्रकार झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप मिसाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी (Police) पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा इथला अमोल गवळीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार संदीप हाॅटेलसमोर दुपारी सव्वा दोन वाजता झाला. भर दुपारी बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची भाषा वापरल्याने खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत अधिकारी दिलीप मिसाळ (वय 39) हे दुपारी संदीप हाॅटेलच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभे होते. त्यावेळी संशयित अमोल गवळी तिथं आला. त्याने मिसाळ यांना धमकावयाला सुरवात केली. 'ये ग्रामसेवका, इकडे बघ, माझ्याजवळ बंदूक आहे, यातल्या सहा गोळ्या घालीन, तू आमच्या विरोधकांचे ऐकून काम करत होतास. आमचे नेते आता खासदार झाला आहेत'.
गवळी एवढ्या धमकीवर थांबला नाही, तर 'आम्ही आमच्या विरोधकांची आणि तुझी गाठ घेणार आहोत', असे म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर घाबरलेले ग्रामपंचायत अधिकारी मिसाळ यांनी कोतवाली पोलिसांकडे धाव घेतली. तिथं अमोल गवळीविरोधात गुन्हा दाखल केले.
ग्रामपंचायत अधिकारी दिलीप मिसाळ यांना धमकी देताना गवळी याने आमचे नेते आता खासदार झाले आहेत. आम्ही आमच्या विरोधकांची आणि तुझी गाठ घेणार आहोत, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. नेते आणि खासदार हे शब्द गवळी याच्या तोंडून आल्याने विद्यमान खासदाराच्या नावाचा धमकीसाठी वापर केला गेला असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.