Samruddhi Mahamarg 2nd Phase:
Samruddhi Mahamarg 2nd Phase: Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg 2nd Phase: समृद्धी महामार्गाचे शिंदे-फडणवीसांनी केलं लोकार्पण...; दुसऱ्या टप्प्यावर 'या' आहेत सुविधा

सरकारनामा ब्यूरो

Samruddhi Mahamarg :  मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे (Samruddhi Mahamarg Mumbai Nagpur Expressway) आज (२६ मे) लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत आयोजित सोहळ्यात या महामार्गाचे लोकार्पण केलं. शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी लांबीचा महामार्ग आहे. (Shinde-Fadnavis inaugurated the second phase of Samriddhi Highway)

आजपासून हा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे.  यापुर्वी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर आज (२६ मे) दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीरपर्यंतचे दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. (Shinde- Fadanvis News)

शिर्डी ते भरवीर हा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यापुर्वी डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी हा 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर शिर्डी ते भरवीर अशा 80 किमी लांबीच्या महामार्गाचे काम पुर्ण झाले असून आज या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. (Samruddhi Mahamarg 2nd Phase)

आज लोकार्पण होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर खालील सुविधांचा समावेश

- ७ मोठे पूल

- १८ छोटे पूल वाहनांसाठी

-३० भुयारी मार्ग हलक्या वाहनांसाठी

-२३ भुयारी मार्ग

-३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज

-५६ टोल बूथ

-६ वे- ब्रिज

Edited By- Anuradh Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT