Supreme court on Shivsena : सोळा आमदारांची अपात्रता आणि राज्य सरकारच्या खटल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र आज दिलेला निकाल तीन दिवस आधीच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी तंतोतंत सांगितला होता. यावर लोक चर्चा करतात तसा काहीच निकाल येणार नाही, असा त्यांचा दावा आहे. त्याची बातमी `सरकारनामा`त प्रकाशित झाली होती. त्यामुळे आज श्री. कांदे चर्चेत आला आहे. (Nashik`s Eknath Shinde group`s Information given perfect information)
राज्यातील (Maharashtra) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), भाजप (BJP) सरकारच्या स्थैर्याबाबत विविध मतप्रवाह व चर्चा घडत होत्या. मात्र आमदार सुहास कांदे यांनी असे काहीच होणार नाही. नेमके काय होईल, का होईल व त्याची कारणे काय? हे त्यांनी आधीच कथन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेला निकाल अगदी तसाच आला आहे.
याबाबत आमदार कांदे यांनी सांगितले होते की, याबाबत केवळ माध्यमांतूनच बातम्या येतात. आम्ही सर्व आमदार व पक्षाचे नेते निर्धास्त आहोत. कारण आम्ही नियमाबाहेर जाऊन काहीही केलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता बहुमत चाचणी घेतली असती तर कदाचीत आम्ही पक्षविरोधी ठरलो असतो. मात्र आम्ही जेव्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हते. आधी आम्ही सभापती पदासाठी मतदान केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावाला मतदान केले. त्यात पक्ष विरोधी काहीच ठरत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कुठेच वेगळे काही मतदान केलेले नाही.
नवाब राबीया प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत उल्लेख होतो, त्यात व शिंदे गटाच्या स्थितीत खुप फरक आहे, असा कांदे यांचा दावा होता. नवाब राबीया यांनी राजीनामा दिला नव्हता. इथे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री कार्यरत असताना इथे काहीच घडलेले नव्हते.
महाराष्ट्रातील सत्तांतराच्या घटनेचे साम्य अखिलेश यादव प्रकरणाशी शिंदे गटाच्या स्थितीचे साम्य आहे. समाजवादी पक्षाची स्थापना मुलायमसिंग यादव यांनी केली होती. आमदार मात्र अखिलेश यादव यांच्या सोबत होते. निकाल अखिलेश यांच्या बाजुने लागला. शिवसेनेच्या खटल्यातही तसेच होईल. अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणारच नाही. ते हे प्रकरण पुन्हा सभापतींकडे पाठविण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे आम्ही सर्व निर्धास्त आहोत, असे कांदे म्हणाले होते. आजही बव्हंशी निकालाची निरीक्षणे त्याच्याशी साम्य असलेली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.