Dhananjay Munde & Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suhas Kande News : सुहास कांदे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना हायकोर्टात खेचणार!

Sampat Devgire

Suhas Kande aggressive On Drought Issue : माझा मतदारसंग पावसाचा खंड, आणेवारी आणि आणि टंचाई या सगळ्या निकषांत बसतो आहे. तरीही कृषी विभाग आमच्यावर अन्याय करणार असेल, तर सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आक्रमक आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे. (State Government shall give relief for Nandgaon Farmers)

आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे, अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार विविध प्रश्नांवर थेट पालकमंत्री आणि सरकारशी पंगा घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले, सॅटेलाइटच्या डोळ्यांना सर्वेक्षणात नांदगावचा दुष्काळ दिसला. मात्र, प्रत्यक्षात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नाहीत, असाच काहीसा प्रकार सध्या माझ्या नांदगाव मतदारसंघाची स्थिती आहे.

नांदगाव तालुक्याच्या वाट्याला आला आहे. याउलट सगळं कस आलबेल असल्याची इमेज सॅटेलाइटने टिपली असावी, असे वातावरण यंत्रणेकडून उभे करण्यात आले, त्यात भर घातली ती शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने... दुष्काळासाठी स्वीकारण्यात आलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ या कार्यपद्धतीच्या नोंदीतून नांदगाव गायब झाले आहे.

सरकारचे काहीही धोरण असले तरीही प्रत्यक्ष दुष्काळ आहे. जनता होरपळते आहे. लोकांना दिलासा हवा आहे. त्याबाबत कृषिमंत्री निर्णय घेणार नसतील, याबाबत मला न्यायालयात धाव घ्यावी लागेल. त्याआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT