Jaykumar Rawal kamraj Nikam sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics : भाजपला धक्का! मोठा नेता शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Sharad Pawar Jaykumar Rawal kamraj Nikam : आमदार रावल यांनी कामराज निकम यांच्या पत्नी, जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही.

Sampat Devgire

NCP Vs BJP News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर धुळे मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिंदखेडा येथील भाजप नेते कामराज निकम यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात बंड केले आहे. कामराज निकम आपल्या समर्थकांसह येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

शिंदखेडा मतदारसंघात आमदार जयकुमार रावल यांनी दिलेली आश्वासन न पाळल्याने रावल यांनी मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदार रावल यांनी कामराज निकम यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही याबाबत निकम यांच्याशी चर्चा केली होती. मात्र हा शब्द पाळला गेला नाही.

या घडामोडींमुळे गेले काही दिवस निकम नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. या नाराजीचा फायदा उठविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे.या निमित्ताने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते व आमदार रावल यांना आव्हान मिळणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

निकम यांनी आमदार रावल यांच्यावर कठोर टीका केली. गेल्या पाच वर्षात मतदार संघात कोणतीही ठोस कामे झाली नाही. अनेक कामे प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही केला. आम्ही विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यावर आमदारांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आमदार रावल हे केवळ विकास कामे केल्याचा देखावा निर्माण करीत आहेत. या देखाव्यातूनच त्यांनी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी निवडणुकीत आम्ही मतदारसंघातील समस्यांचे खरे चित्र मतदारांपुढे मांडू, असे निकम यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, महिला आघाडी अध्यक्षा उषा पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, ललित वारूळे, कैलास ठाकरे, रतिलाल पाटील, आनंदा पाटील, देविदास मोरे आदी विविध राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT