Utkarsha Rupwate News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Utkarsha Rupwate News: उत्कर्षा रूपवतेंच्या 'वंचित'मधील एन्ट्रीने शिर्डीत तिरंगी लढत होणार?

Shirdi Lok Sabha Election 2024: उत्कर्षा रूपवते यांना वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रूपवतेंना वंचितकडून उमेदवारी मिळाली तर शिर्डी मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत होईल.

Mangesh Mahale

Shirdi Political News : काँग्रेसचा 'हात'सोडून 24 तास होण्यापूर्वीच उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Shirdi Lok Sabha Election 2024) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला.

शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते या नाराज होत्या. ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची आग्रही मागणी ठाम मागणी होती.

मागणी मान्य न झाल्याने त्यांनी काल सायंकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. या वेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे उपस्थित होते.

रूपवते यांच्या राजीनाम्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. उत्कर्षा रूपवते यांना वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रूपवतेंना वंचितकडून उमेदवारी मिळाली तर शिर्डी मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत होईल.

शिर्डीमधून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत होईल. रूपवर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर ठाकरेंच्या (Uddhav Thacketay) उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • शिर्डी लोकसभा हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

  • पूर्वी येथे काँग्रेसचा उमेदवार सातत्याने निवडून येत, असा मतदारसंघ हा राखीव आहे.

  • 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिर्डीची शिवसेना जिंकत राहिली.

  • 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.

  • शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती.

  • वाकचौरे पुन्हा एकदा ठाकरेंकडे आले आहेत.

  • रूपवते निवडणुकीत उतरल्या तर आघाडीला मिळू शकणाऱ्या मतांचे विभाजन होऊ शकते.

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT