Shirpur Assembly Election 2024 amrish patel student development education 
उत्तर महाराष्ट्र

Shirpur Assembly Election 2024 : `शिरपूर ६०`द्वारे विद्यार्थ्यांचा विकास - अमरिशभाई पटेल

राजकीय व सामाजिक वाटचालीत शिरपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आदिवासीबांधव आणि इतर विविध सामाजिक घटकांच्या उन्नतीची कास धरली.

सरकारनामा ब्यूरो

शिरपूर : राजकीय व सामाजिक वाटचालीत शिरपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आदिवासीबांधव आणि इतर विविध सामाजिक घटकांच्या उन्नतीची कास धरली. यात 'शिरपूर ६०' हा माझा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून आदिवासी व इतर अनेक विद्यार्थ्यांना घडवतोय.

याद्वारे त्यांना डॉक्टर, अभियंता, उच्चपदस्थ अधिकारी बनविण्यासाठी परिश्रम घेतले जात असताना पुढील वर्षी १२० विद्यार्थी घडविणार आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी दिली.

शिरपूर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ बोराडी येथे बोराडी, कोडीद, पळासनेर जिल्हा परिषद गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांची सभा झाली. आमदार पटेल, आमदार पावरा, भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महायुती समन्वयक डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सदस्य योगेश बादल, मोगरा पाडवी,

तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, निवडणूक प्रभारी के. डी. पाटील, माधवराव पाटील, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, पंचायत समिती सभापती लताबाई पावरा, वसंत पावरा, नारायणसिंग चौधरी, प्रा. संजय पाटील, शिवसेनेचे मनोज धनगर, कन्हय्या चौधरी, युवराज राजपूत, आरपीआयचे बाबा थोरात, रोहित रंधे, शशांक रंधे, सांगवी मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष मंजीत पावरा आदी उपस्थित होते.

पावरांना मताधिक्य द्यावे

आमदार पटेल म्हणाले, की सर्वप्रथम आमदार झाल्यावर १९९० मध्ये आदिवासी भागात हिंडलो. असंख्य रस्ते, पूल, दळणवळणाची कामे केली. तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यात ग्रामीण, आदिवासी भागाची विजेची समस्या दूर करणार आहे. बोराडी ते गिधाडे दर्जेदार रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरु झाले आहे.

स्व. कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्यानंतर आता तुषार रंधे, राहुल रंधे यांचे बोराडीच्या विकासात मोठे योगदान आहे. साखर कारखाना लवकर स्थितीत सुरु होणार असून अफवांना बळी पडू नये. निष्कलंक उमेदवार आमदार पावरा यांना मताधिक्याने निवडून द्यावे. आमदार पावरा म्हणाले,

की आदिवासी भागात वन सातबारे वाटप करून महसूल फायदे मिळवून देणारा एकमेव शिरपूर तालुका ठरला आहे. सलाईपाडा धरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. राहुल रंधे म्हणाले, की बोराडी येथे अमरिशभाईंच्या मार्गदर्शनाखाली कामे करत आहोत. दोन्ही आमदारांनी विकासकार्यात भेदभाव केला नाही. त्यामुळे उमेदवार पावरा यांना साथ द्यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT